जाहिरात

SRH Vs LSG: W, W.. अनसोल्ड शार्दुलचा डबल धमाका अन् काव्याचा चेहराच पडला, रिॲक्शन VIRAL

IPL 2025 LSG Vs SRH: शार्दुलने शॉर्ट लेन्थ बॉल टाकला. अभिषेकने स्क्वेअर सीमारेषेकडे पुल शॉट मारला मात्र चेंडू जास्त लांब न गेल्याने निकोलस पुरनने त्याचा झेल घेतला.

SRH Vs LSG: W, W.. अनसोल्ड शार्दुलचा डबल धमाका अन् काव्याचा चेहराच पडला, रिॲक्शन VIRAL

IPL 2025 SRH Vs LSG: आयपीएल 2025 चा 7 वा सामना आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली असून हैद्राबादच्या दिग्गज फलंदाजांना स्वस्तात तंबुत धाडले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर लखनौच्या संघासमोर दिग्गज फलंदाजांची मांदियाळी असलेल्या हैदराबादच्या खेळाडूंना रोखण्याचे आव्हान होते. मात्र शार्दुल ठाकूरने जबरदस्त गोलंदाजी करत अभिषेक शर्मा आणि इशान किशनला तंबुत धाडले त्यानंतर हैदराबादचा डाव गडगडला. शार्दुल ठाकूरने सनरायझर्स हैदराबादच्या दोन स्फोटक फलंदाजांना सलग दोन चेंडूंवर बाद करून आपल्या संघाला मोठा दिलासा दिला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने अभिषेक शर्माला बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशान किशनला पुढच्याच चेंडूवर शार्दुलने विकेटमागे झेलबाद केले.

IPL 2025: पहिल्यांदाच संघात आले अन् 'विजय'श्री ठरले! 'या' 6 गेमचेंजर खेळाडूंनी रचला नवा इतिहास

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शार्दुल ठाकूरने पहिले षटक टाकला. त्याने या षटकात फक्त 6 धावा दिल्या. या षटकात त्याने ट्रॅव्हिस हेडला 5 चेंडू टाकले, ज्यामध्ये फक्त एकच चौकार लागला. पहिल्या षटकात शानदार गोलंदाजी केल्यानंतर, त्याने तिसऱ्या षटकात सलग 2 बळी घेतले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरने अभिषेक शर्माची शिकार केली. शार्दुलने शॉर्ट लेन्थ बॉल टाकला. अभिषेकने स्क्वेअर सीमारेषेकडे पुल शॉट मारला मात्र चेंडू जास्त लांब न गेल्याने निकोलस पुरनने त्याचा झेल घेतला.

त्यानंतर दुसऱ्याच चेंडूत ईशान किशन शून्यावर आऊट झाला. शार्दुलने सलग दोन बळी घेतल्यानंतर हैदराबादची मालकीण काव्या मारनचा चेहरा खर्रकन उतरला.  दरम्यान, त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 28 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 षटकार आणि ५ चौकार मारले. त्याला 8 व्या षटकात नवखा गोलंदाज प्रिन्स यादवने बोल्ड केले.