चेन्नईने दिलेल्या 153 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचीही सुरूवात चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा हा दुसऱ्याच बॉलवर शुन्यावर आऊट झाला. त्याला खलील अहमद याने आऊट केले. त्यापाठोपाठ ट्रॅव्हिस हेडला ही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो केवळ 19 धावा काढून बाद झाला. हेनरिक क्लासेन या सामन्यातही विशेष काही करू शकला नाही. त्याला अवघ्या सात धावा करता आल्या. इशांत किशनने एक बाजू लावून धरली. त्याने 34 चेंडूत 44 धाव केल्या. या खेळीत त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. त्याला नूर अहमदने बाद केले. कमिंदू मेंडिस आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादने चेन्नईने दिलेले लक्ष्य 19 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. हैदराबादने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्यात हैदराबादने टॉस जिंकला. त्यानंतर त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला अजूनही सुर सापडलेला नाही. त्यांना एकामागून एक पराभव स्विकारावे लागत आहेत. त्यांच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशाही मावळल्या आहेत. त्या हैदराबाद बरोबर खेळताना चेन्नईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. हर्षल पटेल, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकर यांच्या माऱ्या समोर चेन्नईचा संघ संपूर्ण 20 ओव्हर्स ही खेळू शकला नाही. त्यांचा डाव 153 धावांत कोसळला. हैदराबाद समोर त्यांनी 154 धावांचे लक्ष ठेवले.
चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिस याने सर्वाधिक 42 धावा केल्या. 25 चेंडूंचा सामना करताना त्याने चार षटकार आणि एक चौकार ठोकले. पण त्याला दुसऱ्या बाजून योग्य साथ मिळाली नाही. चेन्नईची सुरूवातही खराब झाली. ओपनिंगला आलेल्या शाईक रशीद याला खातं ही खोलता आलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मुंबईकर आयुश म्हात्रेने 19 चेंडूत 30 धावा केल्या. रवींद्र जडेजा, दीपक हुडा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मोठी धावसंख्या उभारती आली नाही. शिवम दुबे आणि कॅप्टन धोनीने निराशा केली.
हैदराबादने मात्र टिच्चून बॉलिंग केली. हर्षल पटेल, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकर या बॉलर्सने चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवले होते. हर्षल पटेलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्या बदल्यात त्याने केवळ 28 धावा दिल्या. तर पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकर यांनी प्रत्येक दोन बॅट्समनला आऊट केले. महम्मद शामी आणि कमिंदू मेंडिस यांनी एक एक फलंदाज बाद केला. त्यामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.