
Pakistan Super League: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरु असलेली पाकिस्तान सुपर लीग (PSL) अडचणीत सापडली आहे. त्यामुळे यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं (PCB) टेन्शन वाढलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीयांचा होता सहभाग
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पीएसलचे प्रसारण करणाऱ्या अनुभवी भारतीय तंत्रज्ञांनी परत जाण्याचा निर्णय घेतलाय. सध्या पीएसएलच्या प्रसारणात दोन डझनपेक्षा जास्त भारतीयांचा सहभाग आहे. हे सर्व अनुभवी तंत्रज्ञ आहेत. आता त्यांच्या जागेवर नव्या व्यक्तींची नेमणूक केली जाईल, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं आहे. पण बराच काळ या स्पर्धेशी संबंधित तंत्रज्ञ एकदम परतणार असल्यानं त्याचा थेट परिणाम या स्पर्धेच्या प्रसारणावर होणार आहे.
PCB च्या सूत्रांनी सांगितलं की, 'ब्रॉडकास्ट आणि प्रॉडक्शन टीममध्ये सर्व भारतीय आहेत ही अडचण आहे. त्यामध्ये इंजिनिअर, प्रोडक्शन मॅनेजर, कॅमेरामन, प्लेयर ट्रॅकिंग एक्सपर्ट यांचा समावेश आहे. पीएलच्या लाईव्ह प्रसारणाचं काम हे सर्व करतात. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानच्या विरुद्ध काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानंतर पाकिस्तान सरकारनं देखील काही निर्णय घेतले आहेत. त्यानंतर पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तान सोडावं लागेल.'
( नक्की वाचा : What is Kalima? : कलमा म्हणजे काय? इस्लाममधील पवित्र श्लोकाचा अर्थ माहिती आहे का? )
भारतामध्ये प्रसारण नाही
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रीडा कंपनी फॅन्सकोडनं पाकिस्तान सुपर लीगशी (PSL) संबंधित सर्व व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आले आहेत. या कंपनीकडून पीएसएलचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येत होते. हे सामने दाखवण्यात येत असल्याबद्दल फॅन्सकोडवर जोरदार टीका होत होती. त्यानंतर कंपनीनं हे प्रसारण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world