Shreyas Iyer's mother viral moment: आयपीएल 2025 चा अंतिम सामना पंजाब किंग्स आणि आरसीबी यांच्यात अहमदाबाद येथे खेळला जाईल. दोन्ही संघांचे चाहते या सामन्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्याचबरोबर, पंजाब किंग्सचे चाहते आपला संघ चॅम्पियन व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. श्रेयस अय्यरच्या आईनेही फायनलपूर्वी पंजाब किंग्सच्या विजयाबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. पंजाब किंग्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अय्यरच्या बहिणीने आणि आईने पंजाब संघासाठी भावनिक संदेश पाठवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रेयसच्या बहिणीने चाहत्यांचे आभार मानले आहेत. शिवाय पंजाब नक्कीच चॅम्पियन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. "पंजाबच्या सर्व चाहत्यांचे पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही खूप-खूप आभारी आहोत. संघाला खूप-खूप शुभेच्छा. आणि आम्हाला तुमच्या प्रत्येकाचा खूप अभिमान आहे. फायनलचा दिवस आपलाच आहे. फक्त तिथे जा आणि ट्रॉफी उचला. आम्ही फायनलबाबत खूप उत्सुक आहोत." यानंतर श्रेयसच्या आईनेही खास संदेश देत म्हटले, "सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय फक्त जिंकायचं असं ही त्या म्हणाल्या आहेत."
आरसीबीचा संघ: विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), स्वास्तिक चिकारा, जितेश शर्मा, फिलिप सॉल्ट, मनोज भंडागे, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, रोमारिओ शेफर्ड, स्वप्निल सिंग, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवुड, नुवान तुषारा, यश दयाल, रसिख दार सलाम, सुयश शर्मा, मोहित राठी, अभिनंदन सिंग, मयंक अग्रवाल, ब्लेसिंग मुझरबानी, टिम सेफर्ट.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 Final: पंजाब की बंगळुरु कुणाचं स्वप्न होणार पूर्ण? 5 खास योग निश्चित करणार चॅम्पियन पंजाब किंग्सचा संघ: नेहल वढेरा, हरनूर सिंग, श्रेयस अय्यर, मुशीर खान, पायला अविनाश, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद, जोश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, अजमतुल्लाह उमरजई, एरॉन हार्डी, हरप्रीत ब्रार, सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, मिशेल ओवेन, काईल जेमीसन