
IPL 2025 Final, PBKS vs RCB: आयपीएल 2025 ची फायनल मॅच आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. दोन्ही टीम यंदा पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करतील. क्रिकेट फॅन्समध्ये या मॅचची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. आरसीबी चौथ्यांदा तर पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. या फायनलपूर्वी 5 खास योग जुळून आले आहेत जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे पाच योग कोणते? ते आपण पाहूया
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
क्वालिफायर 1 जिंकणारी टीम चॅम्पियन
आयपीएलच्या इतिहासा 14 पैकी 11 वेळा क्वालिफायर 1 जिंकणारी टीम विजेती ठरली आहे. 2008 ते 2010 पर्यंत लीगचे नॉकआउट सामने सेमीफायनल फॉरमॅटमध्ये खेळले जात होते. त्यावेळी दोन सेमीफायनल आणि एक फायनल सामना खेळला जात असे. 2011 मध्ये नियम बदलले आणि प्लेऑफची सुरुवात झाली. नवीन प्रणालीनुसार, पॉईंट टेबलमध्ये टॉप-२ मध्ये असलेल्या टीमना फायनलमध्ये पोहोचण्याची संधी 2 वेळा मिळते. हा नियम सुरु झाल्यापासून 2024 पर्यंत क्वालिफायर 1 जिंकणाऱ्या टीमनं 11 वेळा विजेतेपद पटकावले आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 Final : RCB फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या 'EE Sala Cup Namade' या घोषणेचा अर्थ काय? )
आता विराटची पाळी
यावर्षी क्रीडा जगतात काही असे पराक्रम घडले आहेत, जे पहिल्यांदाच झाले. उदाहरणार्थ, पीएसजीने 55 वर्षांत प्रथमच चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले. तर क्रिस्टल पॅलेसने 119 वर्षांची प्रतीक्षा संपवत एफए कपच्या फायनलमध्ये मँचेस्टर सिटीला हरवून प्रथमच युरोपियन स्पर्धेत स्थान मिळवले. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलचे विजेतेपद एकदाही जिंकलेले नाही. पण, हा योग लक्षात घेतल्यानंतर विराटचं आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न आज पूर्ण होऊ शकतं.
3 जून आणि विराट कनेक्शन
आयपीएल 2025 ची फायनल 3 जून रोजी होत आहे. या तारखेचं विराट कोहलीशी खास कनेक्शन आहे. 3 जून म्हणजेच 03-06-2025 या तारखेची बेरीज (3+6+2+0+5) 18 होते. हा विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर देखील आहे. त्याचा विराटला फायदा होऊ शकतो.
( नक्की वाचा : IPL Final Predictions: IPL 2025चा विजेता कोण? AI ने केली मोठी भविष्यवाणी; 'हा' संघ बाजी मारणार? )
अय्यर- पाटीदार आणि फायनल
श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा तर रजत पाटीदार हा आरसीबीचा कॅप्टन आहे. हे दोन्ही कॅप्टन यापूर्वी यावर्षीच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या फायनलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळले होते. त्यावेळी अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या टीमनं पाटीदारच्या मध्य प्रदेश टीमचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
'वीर-झारा' सिनेचा योग
चित्रपटाच्या योगाचा विचार केला तर यावर्षी झारा म्हणजेच प्रीती झिंटाची टीम आयपीएलचं विजेतेपद पटकावू शकते. कारण वीर म्हणजेच शाहरुख खानच्या टीमनं 2024 साली आयपीएल विजेतेपद पटकावले. त्यावेळी श्रेयस अय्यर केकेआरचा कॅप्टन होता. आता तो पंजाबचा कॅप्टन आहे. या योगायोगामुळे अय्यर 'झारा' प्रीती झिंटाला विजेतेपद मिळवून देऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world