IPL 2025: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. एकीकडे 204 धावांचा पाठलाग करत दिमाखदार विजय मिळवला असतानाच कर्णधार शुभमन गिलला मात्र बीसीसीआयने लाखोंचा दंड ठोठावला आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला स्लो ओव्हर रेट टाकल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. या हंगामात या नियमाखाली हा त्याचा पहिलाच गुन्हा होता, त्यामुळे त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल 2025 च्या 35 व्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्यानंतर दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा होता, गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे."
Unauthorized Schools: अंबरनाथ तालुक्यात 6 अनधिकृत शाळा! शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केली यादी, वाचा...
204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्सकडून जोस बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 54 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 97 धावा केल्या. बटलर त्याच्या शतकापासून 3 धावा कमी पडला आणि त्याच्या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्याशिवाय शेरफेन रदरफोर्डनेही 34 चेंडूत 43 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. फक्त कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 203 धावा केल्या होत्या. कर्णधार अक्षर पटेलने सर्वाधिक धावा (39) केल्या, 32 चेंडूंच्या या डावात त्याने 2 षटकार आणि 1 चौकार मारला. करुण नायरने 31, केएल राहुलने 28, ट्रिस्टन स्टब्सने 31 आणि आशुतोष शर्माने 37 धावा केल्या. या सामन्यात, गरम हवेने खेळाडूंना त्रास दिला होता. जेव्हा दिल्ली कॅपिटल्स फलंदाजी करत होते, तेव्हा गुजरातचा गोलंदाज इशांत शर्माची प्रकृती इतकी बिकट झाली की त्याला मैदान सोडावे लागले.
नक्की वाचा - Crime News : उल्हासनगरमधील पुजाऱ्यावर अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला, धक्कादायक कारण आलं समोर