जाहिरात

Crime News : उल्हासनगरमधील पुजाऱ्यावर अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला, धक्कादायक कारण आलं समोर

Ulhasnagar Crime News : पुजारी चांदवानीच्या डोक्याला, हाताला, पाठीवर, पायावर गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Crime News : उल्हासनगरमधील पुजाऱ्यावर अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला, धक्कादायक कारण आलं समोर

निनाद करमरकर, अंबरनाथ

Ulhasnagar News : उल्हासनगरमधील पुजाऱ्यावर अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यात पुजारी धीरज भोलाथानी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी जेठो चांदवानी, आयप्पन नायडू आणि इतर साथीदारांविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी आयप्पन नायडू, जेठो चांदवानी आणि इतर साथीदारांनी अंबरनाथच्या ऑर्डन्स परिसरात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने पुजाऱ्याला बोलावून हा हल्ला केला. यात पुजारी चांदवानीच्या डोक्याला, हाताला, पाठीवर, पायावर गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

( नक्की वाचा : Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका )

तसेच अमानुष मारहाण केल्यानंतर आरोपी यांनी चांदवानी याच्या खिशातून दोन मोबाईल देखील काढून घेतले आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: