लखनऊने दिलेल्या 166 धावांचा पाठलाग करताना चेन्नई हे टार्गेट 20 षटकात पूर्ण केले. शिवम दुबे आणि एम.एस. धोनी या जोडीने चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनीने धुवांधार फलंदाजी केली. त्याने 11 चेंडूत 26 धावा केल्या. तर शिवम दुबेन उपयुक्त अशा 43 धावा केल्या. चेन्नईने 19.03 षटकात पाच विकेटच्या बदल्यात 168 धावा केल्या. या विजयामुळे चेन्नईच्या पराभवाची मालिका खंडीत झाली आहे. चेन्नईने 166 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. रचिन रविंद्र शाइक रशीद यांनी धुवाधार सुरूवात करत पाच षटकात चेन्नईची धावसंख्या 52 वर नेली होती. शाईक रशीद 19 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. तर रचिन रविंद्रने 22 चेंडूत 37 धावा करत तंबूत परतला. राहुल त्रिपाटी या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला फक्त 9 धावा करता आल्या. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी सावध फलंदाजी केली. पण रविंद्र जडेचा आणि विजय शंकर यांनाही जास्त धावा करता आल्या नाही. 15 ओव्हरमध्ये 111 धावांवर 5 फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर धोनी मैदानात आला. त्याने लागोपाठ दोन चौकार मारत मैदानात चेन्नईसाठी आशा निर्माण केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुपर जायंट्स लखनऊ विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकला. कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकात 166 धावा केल्या. चेन्नई पुढे 167 धावांचे लक्ष दिले. लखनऊ कडून कर्णधार ऋषभ पंत याने सर्वाधिक 63 धावा केल्या. या धावा त्याने 49 चेंडूत केल्या. त्यात चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. ऋषभ पंत शिवाय लखनऊचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. 7 फलंदाजांच्या बदल्यात 166 धावाच लखनऊला करता आल्या. त्यांच्या विशिष्ट अंतराने विकेट पडत गेल्या.
एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी लखनऊच्या डावाची सुरूवात केली. पण त्यांची सुरूवात चांगली झाली नाही. एडन मार्करम केवळ सहा धावा काढून बाद झाला.मिचेल मार्श 30 याच्या बरोबर आयुष बडोनी 22, अब्दुल समद 20 यांनी छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे लखनऊला 166 धावा करता आल्या. निकोलस पूरण या सामन्यात अपयशी ठरला. तो 8 धावांवर बाद झाला. अन्य फलंदाजाना मात्र आपली छाप सोडता आली नाही.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : लखनौनं रोखली गुजरातची घौडदौड, पॉईंट टेबलमध्ये केली उलथापालथ
चेन्नईने लखनऊच्या फलंदाजांवर पहिल्यापासून नियंत्रण ठेवले होते. रविंद्र जडेजा आणि मथीशा पथिरना यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले. तर खलील अहमद आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येक एक गडी बाद केला. नूर अहमद आणि जेमी ओव्हटन यांना मात्र एकही गडी बाद करता आला नाही. नूर अहमदला एकही गडी बाद करता आला नसला तरी त्याने चार ओव्हर मध्ये फक्त 13 धावा दिल्या.