
IPL 2025, SRH vs PBKS : आयपीएल 2025 मधील 27 वा सामना कमालीचा उत्कंठावर्धक झाला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) यांच्यात ही लढत झाली. या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करत 6 आऊट 245 रन्स केले होते. सनरायझर्सनं हे आव्हान 8 विकेट्स आणि 9 बॉल राखून सहज पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युवराज सिंहचा शिष्य चमकला
246 च्या टार्गेटचा पाठलाग करताना जशी हवी होती तशी सुरुवात सनरायझर्सच्या ओपनिंग जोडीनं केली. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) या जोडीनं पहिल्या विकेटसाठी फक्त 75 बॉलमध्ये 171 रन्सची पार्टनरशिप केली.
या सिझनमध्ये आत्तापर्यंत फॉर्मात नसलेल्या अभिषेक शर्मानं आज आक्रमक बॅटिंगनं अनेक रेकॉर्ड मोडले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळणारा अभिषेक हा सिक्सर किंग युवराज सिंहचा शिष्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानं पंजाब किंग्ज विरुद्ध युवराजला अभिमान वाटावा अशी बॅटिंग केली.
अभिषेकनं फक्त 40 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. त्याची आयपीएल कारकिर्दीमधील ही पहिलीच सेंच्युरी आहे. त्यानं ही सेंच्युरी 11 फोर आणि 6 िसक्सच्या मदतीनं पूर्ण केली. 246 रन्सच्या डोंगराचा पाठलाग करत असताना कुठेही रनरेट कमी होऊ न देता अभिषेकनं ही सेंच्युरी झळकावली.
अभिषेकनं ही सेंच्युरी पूर्ण करताच खिशातून एक पांढरा कागद काढला. तो संपूर्ण मैदानात दाखवला. त्या कागदावर काय लिहिलं होतं याची सर्वांना उत्सुकता आहे. अभिषेकनं त्या चिठ्ठीतून सनरायझर्स हैदराबादच्या सर्व फॅन्सचे आभार मानले.
THE ABHISHEK SHARMA NOTE:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 12, 2025
"This one is for Orange Army". 🧡 pic.twitter.com/o9ZLSQDLp6
अभिषेक सेंच्युरीनंतरही थांबला नाही. त्यानं त्याचा धडाका कायम ठेवला. त्यानं सनरायझर्स हैदाराबादकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्डही मागे टाकला. अभिषेकनं फक्त 55 बॉलमध्ये 256 च्या स्ट्राईक रेटनं 141 रन काढले. आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यानं केएल राहुलचा (132 रन्स) रेकॉर्ड यावेळी मोडला.
सनरायझर्स हैदराबादचा या सिझनमधील हा दुसराच विजय आहे. सलग चार पराभवानंतर सनरायझर्सनं हा विजय मिळवलाय. हा विजय त्यांना आगामी सिझनमधील वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढवणारा असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world