
IPL 2025, LSG vs GT Match Result : आयपीएल 2025 मधील 26 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) यांच्यात झाला. हा सामना सुरु होण्यापूर्वी गुजरातची टीम नंबर 1 वर होती. गुजरातनं यापूर्वीचे चार सामने सलग जिंकत हा क्रमांक पटकावला होता. यजमान लखनौनं त्यांचा 6 विकेट्सनं पराभव केला. लखनौचा या सिझनमधील हा सलग तिसरा विजय आहे. या विजयासह त्यांनी पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ करत टॉप चारमध्ये धडक मारली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लखनौची दमदार सुरुवात
गुजरात टायटन्सनं लखनौसमोर 181 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. या सिझनमध्ये फॉर्मात असलेला मिचेल मार्श (Mitchell Marsh) या मॅचमध्ये वैयक्तिक कारणामुळे खेळू शकला नाही. मार्शच्या अनुपस्थितीमध्ये लखनौचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabah Pant) ओपनिंगला आला होता. पंत आणि एडन मार्करम जोडीनं लखनौला आक्रमक सुरुवात करुन दिली. या जोडीनं पहिल्या 5 ओव्हरमध्येच 50 रन केले.
ऋषभ पंत 21 रन काढून आऊट झाल्यानंतर ही जोडी फुटली. त्यानंतर या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या निकोलस पूरननं (Nicholas Pooran) मार्करमसोबत आक्रमक बॅटिंग सुरु ठेवली. मार्करम 31 बॉलमध्ये 58 रन काढून आऊट झाला. पूरननं या सिझनमधील चौथी हाफ सेंच्युरी 23 बॉलमध्ये पूर्ण केली. त्यानं 6 सिक्सच्या मदतीने ही हाफ सेंच्युरी पूर्ण केली. पूरन 34 बॉलमध्ये 61 रन काढून आऊट झाला.
( नक्की वाचा : IPL 2025 : कॅप्टन बदलला पण निकाल नाही, CSK वर 18 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ओढावली लाजीरवाणी वेळ )
गिल-सुदर्शनची हाफ सेंच्युरी
त्यापूर्वी गुजरात टायटन्सकडून कॅप्टन शुबमन गिल (Shubman Gill ) आणि साई सुदर्शन (Sai Sudharsan) या सलामीवीरांनी हाफ सेंच्युरी झळकावली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 120 रनची पार्टनरशिप केली. गिल (60) आणि सुदर्शन (56) रन काढून आऊट झाल्यानंतर गुजरातच्या इनिंगला ब्रेक लागला.
जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर झटपट आऊट झाले. त्यानंतर रदरफोर्डनं 22 रन करत गुजरातचा स्कोअर 180 पर्यंत पोहचवला. पण, फॉर्मातील लखनौच्या बॅटरसमोर हा स्कोअर अखेर तोकडाच ठरला.
लखनौनं या विजयानंतर सहाव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर गुजरातची पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world