जाहिरात

RR Vs GT: 'वैभव'शाली खेळीवर सचिनही फिदा! विक्रमी शतकाची 'चतुःसूत्री' सांगितली, युवराजही भारावला

IPL 2025 RR Vs GT: त्याच्या या खेळीनंतर स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

RR Vs GT: 'वैभव'शाली खेळीवर सचिनही फिदा! विक्रमी शतकाची 'चतुःसूत्री' सांगितली, युवराजही भारावला

Vaibhav Suryavanshi Century: आयपीएलच्या मैदानात 28 एप्रिलची सायंकाळ कुठलाच क्रिकेटप्रेमी विसरणार नाही. कारण अवघ्या चौदा वर्षाच्या एका पोराने गोलंदाजांवर तुटून पडत 35 चेंडूंत वादळी शतक झळकावले. या जिगरबाज खेळाडूचे नाव आहे वैभव सुर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या शतकानंतर सोशल मीडियासह क्रिडा जगतात फक्त वैभवच्याच नावाची चर्चा आहे. त्याच्या या खेळीनंतर स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

भारतरत्न सचिन तेंडूलकरने केलं कौतुक!

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सुर्यवंशीने तुफानी खेळी करत अवघ्या 35 धावात शतक झळकावले. त्याने 38 चेंडूत 101 धावा केल्या.  या खेळीत त्याने तब्बल 7 चौके आणि 11 षटकार लगावले. या वादळी खेळीचे सचिन तेंडुलकरनेही तोंडभरुन कौतुक केले आहे. 

वैभवचा बिनधास्त अप्रोच, बॅटचा स्पीड, लेंथ लवकर समजून घेणं आणि चेंडूची एनर्जी ट्रान्सफर करण्याची क्षमता हीच त्याच्या शानदार इनिंगची रेसिपी आहे.. अशा खास शब्दात सचिन तेंडूलकरने या युवा खेळाडूचे तोंडभरुन कौतुक केले आहे. त्याचबरोबर युवराज सिंग युसूफ पठाणनेही या खेळीवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 

युवराज सिंहचेही खास ट्वीट..

'14 वर्षांचा असताना तुम्ही काय करत होतास?!! हा मुलगा डोळे मिचकावत जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना तोंड देत आहे! वैभव सूर्यवंशी — नाव लक्षात ठेवा! निर्भयपणाने खेळत आहे. पुढच्या पिढीला चमकताना पाहून अभिमान वाटतो..' असे खास ट्वीट करत सिक्सर किंग युवराजसिंहनेही त्याचे कौतुक केले आहे. 

युसूफ पठाणकडूनही स्तुतीसुमने
'माझा सर्वात जलद शतकाचा विक्रम एका भारतीयाने मोडल्याबद्दल वैभव सूर्यवंशीचे खूप खूप अभिनंदन. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ते घडताना पाहणे अधिक खास आहे, अगदी माझ्यासारखे. तरुणांसाठी या फ्रँचायझीमध्ये खरोखर काहीतरी जादू आहे. अजून खूप पुढे जायचे आहे, चॅम्पियन..' असे म्हणत युसूफ पठाणनेही ही खेळी ग्रेट असल्याचे म्हटले आहे.