DC vs GT: अटीतटीच्या सामन्यात गुजरातचा दिल्लीवर विजय; केएल राहुलची झंझावाती खेळी व्यर्थ

गुजरात आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत 7 सामने झाले असून त्यापैकी गुजरातने 4 तर दिल्लीने 3 सामने जिंकले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
सौजन्य IPL

IPL 2026: आयपीएल 2026 चा 14 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगला. टॉस दिल्ली संघाने जिंकला आणि गुजरातला प्रथम बॅटींगचे निमंत्रण दिले. या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 211 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना दिल्लीने सावध सुरूवात केली. पॉवर प्लेच्या सहा ओव्हर्समध्ये दिल्लीने 63 धावा केल्या. शिवाय एक ही विकेट टाकली नाही. केएल राहुल आणि निसंका यांनी चांगली सुरूवात करून दिली.  दिल्ली २०९ धावा पूर्ण करू शकली. शेवटच्या क्षणापर्यंत सामना अटीतटीचा होता. अखेर गुजरातने हा सामना जिंकला.  

निसंका 41 धावा करून बाद झाला. तो 24 बॉल खेळला. त्यात एक सिक्स आणि सहा चौकारांचा समावेश होता. त्याला प्रसिद्ध कृष्णाने झेल बाद केले. 76 धावांवर दिल्लीला पहिला झटका बसला. त्यानंतर आलेल्या नितीश राणा याला फार काळ तग धरता आला नाही. तो केवळ पाच धावा काढून बाद झाला. त्याला राशिद खानने बाद केले. त्याच्याच पुढच्या बॉलवर राशिदने समिर रिझवीला क्लिन बोल्ड केले. पण केएल राहुलने एकबाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केले.  तर दुसरीकडे डेव्हिडी मिलर जखमी झाल्याने रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर कॅप्टन अक्षर पटेलला राशिदने आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं. त्याला ही फक्त दोन धावा करता आल्या. राशिदने चार ओव्हर्समध्ये 17 धावा देत 3 विकेट घेतल्या. 

Advertisement

 नक्की वाचा - IPL 2026: शेतकऱ्याच्या पोराची कमाल! IPLमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा पराक्रम, कोण आहे वेगाचा बादशहा?

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर साई सुदर्शनला मुकेश कुमारने स्वस्तात बाद करून दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. साईला फक्त 12 धावा करता आल्या. त्या त्याने 7 बॉलमध्ये केल्या. यात त्याने दोन चौकार लगावले.  साई स्थिरावेल असं वाटत असतानाच तो बाद झाला. मुकेश कुमारने त्याचा बोल्ड उडवला. मात्र, त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुभमन गिलने खणखणीत 70 धावांची खेळी केली. तर फॉर्मात परतलेल्या जोस बटलरने अवघ्या 27 चेंडूत 52 धावा कुटल्या.

नक्की वाचा - VIDEO: पहिल्याच बॉलला वैभवचा सिक्स.. हजारो प्रेक्षकांचा श्वास रोखला; बुमराहची रिएक्शन बघण्यासारखी

शुभमन गिलच्या बॅटींगकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याने सुरवात अतिशय सावध केली. मात्र स्थिरावल्यानंतर त्यांनी फटकेबाजी सुरू केली. 45 चेंडूत त्याने 70 धावा ठोकल्या. त्यात पाच सिक्सचा समावेश होता. तर चार फोर ही त्याने लगावले. त्याला लुंगी न्गिदी याने कॅच आऊट केले. मध्यल्या फळीत वॉशिंग्टन सुंदरने दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. त्याने अवघ्या 32 चेंडूत 55 धावांचे योगदान दिले. ज्यामुळे गुजरातला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. दिल्लीकडून मुकेश कुमारने महत्त्वपूर्ण विकेट घेतली, तर फिरकीपटू कुलदीप यादव आज महागडा ठरला.

नक्की वाचा - VIDEO: आवेश खानची मोठी चूक; लखनऊचा विजय पराभवात बदलला असता; नियम काय सांगतो?

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरात आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत 7 सामने झाले असून त्यापैकी गुजरातने 4 तर दिल्लीने 3 सामने जिंकले आहेत. जर आज दिल्लीने हे 211 धावांचे लक्ष्य गाठले, तर उभय संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड 4-4 असा बरोबरीत येईल.