जाहिरात

IPL 2026: शेतकऱ्याच्या पोराची कमाल! IPLमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा पराक्रम, कोण आहे वेगाचा बादशहा?

आयपीएल २०२६ मध्ये कोणत्याही गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू आहे. दुसऱ्या क्रमांकावर ॲनरिच नॉर्टजे आहे, ज्याने ताशी १५०.९ किमी वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला.

IPL 2026: शेतकऱ्याच्या पोराची कमाल! IPLमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा पराक्रम, कोण आहे वेगाचा बादशहा?

Who is Ashok Sharma: क्रिडा विश्वात सध्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक नवे खेळाडू घडवणारे, स्वप्नांना प्रेरणा देणारे आणि ती पूर्ण करण्याची संधी देणारे एक व्यासपीठ आहे. प्रत्येकवर्षी आयपीएलच्या मैदानात नवीन खेळाडू चमकत असतात. यावर्षीही काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत, जे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. या यादीत अशोक शर्माचे नाव अग्रस्थानी आहे. या आयपीएलमध्ये अशोक शर्माने सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रम केला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, त्याने ताशी १५४.२ किमी वेगाने गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आयपीएल २०२६ मध्ये कोणत्याही गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू आहे. दुसऱ्या क्रमांकावर ॲनरिच नॉर्टजे आहे, ज्याने ताशी १५०.९ किमी वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला.

IPL 2026 RR vs GT : अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मारली बाजी, गुजरात टायटन्सचा निसटता पराभव

कोण आहे अशोक शर्मा?

राजस्थानमधील एका गरीब शेतकरी कुटुंबातील असलेल्या अशोक शर्माला या हंगामात गुजरात टायटन्सने ९० लाख रुपयांना विकत घेतले. अशोकचा मोठा भाऊ अक्षयही क्रिकेट खेळायचा, पण आर्थिक अडचणींमुळे त्याने क्रिकेट सोडून आपल्या लहान भावाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. अक्षयने अशोकसाठी क्रिकेट सोडले आणि आपल्या वडिलांसोबत मिळून अशोकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले.

धाकट्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या भावाने क्रिकेट सोडले
अशोक शर्मा जयपूरजवळील रामपुरा या गावचा रहिवासी असून, त्याचा क्रिकेटपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. तो एका साध्या शेतकरी कुटुंबात वाढला, जिथे पैशांची चणचण होती आणि त्याचे वडील नथुलाल  फक्त एकाच मुलाच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पाठबळ देऊ शकत होते.  यामध्ये अशोकचा मोठा भाऊ अक्षय शर्माने,अशोकला त्याची आवड जोपासता यावी यासाठी स्वतःचे क्रिकेटचे स्वप्न सोडून दिले.  अक्षयने शेती आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करत खेळापासून दूर राहून, आपल्या पालकांना अशोकच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी राजी केले.

या २३ वर्षीय गोलंदाजाचा प्रवास सोपा नव्हता. अंडर-२३ स्तरावर संधी मिळवण्यासाठी संघर्ष केल्यानंतर, अशोक शर्माने खेळ सोडण्याचा विचारही केला होता. तथापि, त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी संधी २०२५-२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान मिळाली, जिथे त्याने १० सामन्यांमध्ये २२ बळी घेत एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले. अशोक शर्माने ३१ मार्च रोजी पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि ताशी १४९.७ किमी वेगाने आपला पहिला चेंडू टाकत कमाल केली. लवकरच त्याने आपला पहिला आयपीएल बळी घेतला; त्याने बॅक-ऑफ-द-हँड स्लोअर डिलिव्हरीने मार्को जॅनसेनला बाद केले आणि १/३१ या आकडेवारीसह सामना संपवला.

CSK vs PBKS : चेन्नईचा 'तो' मास्टर प्लॅन सलग दुसऱ्यांदा फसला, हुकमी एक्काच ठरतोय पत्त्याचा बंगला !

आयपीएल २०२६ मधील ५ सर्वात वेगवान चेंडू

  • १५४.२ किमी प्रति तास – अशोक शर्मा (जीटी)
  • १५०.९ किमी प्रति तास – ॲनरिच नॉर्टजे (एलएसजी)
  • १४९.७ किमी प्रति तास – कार्तिक त्यागी (केकेआर)
  • १४९.१ किमी प्रति तास – कागिसो रबाडा (जीटी)
  • १४५.६ किमी प्रति तास – जेमी ओव्हरटन (सीएसके)

आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

  • १५७.७१ किमी/तास – शॉन टेट (राजस्थान रॉयल्स, २०११)
  • १५७.४ किमी/तास – जेराल्ड कोएत्झी (मुंबई इंडियन्स, २०२४)
  • १५७.३ किमी/तास – लॉकी फर्ग्युसन (गुजरात टायटन्स, २०२२)
  • १५७.० किमी/तास – उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद, २०२२)
  • १५६.७ किमी/तास – मयंक यादव (लखनौ) सुपर जायंट्स, २०२४)
  • १५६.२२ किमी/तास – एनरिके नोकिया (दिल्ली कॅपिटल्स, २०२०)
  • १५४.२ किमी/तास – अशोक शर्मा (गुजरात टायटन्स, २०२६)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com