IPL 2026 MI vs PBKS: पंजाबची बल्ले-बल्ले! मुंबईला घरच्या मैदानावर चारळी धुळ, सलग चौथा पराभव

त्या आधी मुंबई इंडियन्सने सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग 11 चा भाग नव्हता.

जाहिरात
Read Time: 3 mins
सौजन्य IPL
मुंबई:

MI vs PBKS:आयपीएल 2026 च्या थरारात आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर हाय-व्होल्टेज सामना रंगला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 बाद 196 धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डी कॉकने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत नाबाद 112 धावांची खेळी केली. त्याला नमन धीरने 31 चेंडूत 50 धावा करून मोलाची साथ दिली. पंजाब समोर विजयासाठी 197 चे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात झाली. नाही प्रियांश आर्य 15 धावांत बाद झाला. 

कपूर कॉनोली याला ही चांगल्या धावा करता आल्या नाहीत. तो 12 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्याला ही अल्लाह गझनफर याने बाद केले.  त्यानंतर मात्र प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला.  या दोघांच्या भागीदारीमुळे 10 ओव्हर्समध्ये पंजाबने 100 धावा ही पूर्ण केल्या. प्रभसिमरनने आपलं अर्धशतक ही पूर्ण केलं. त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरने ही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 35 बॉल्समध्ये 66 धावांची खेळी केली. प्रभसिमरनसोबत त्याने शंभर पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. पंजाबने 16.3 ओव्हर्समध्ये लक्ष्य पूर्ण केलं. पंजाबने तीन गडी गमावत 198 धावा करत सात विकेटने मॅच जिंकली. मुंबईला त्यांनी घरच्याच मैदानावर हरवलं. मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला. पंजाबकडून सर्वाधिक 80 धावा प्रभसिमरन सिंग याने केला. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला आपला प्रभाव पाडता आला नाही. 

Advertisement

नक्की वाचा - T20 Captaincy: सूर्याचे कर्णधारपद धोक्यात? 'हे' 5 खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत, BCCI मोठा निर्णय घेणार

त्या आधी मुंबई इंडियन्सने सर्वांनाच आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग 11 चा भाग नव्हता. त्यामुळे चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र, त्याच्या जागी संधी मिळालेल्या क्विंटन डी कॉकने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत ती कसर भरून काढली. डीकॉकने 60 चेंडूत 112 धावा ठोकल्या. त्यात त्याने 7 सिक्स आणि 8 चौकार लगावले. नमन धीरने त्याला चांगली साथ दिली. नमन ने 31 बॉलमध्ये 50 धावा  केल्या. त्यात तीन सिक्स आणि तीन फोरचा समावेश होता. 

नक्की वाचा - Vinod Kambli: अरे बापरे! विनोद कांबळीला 'हे' काय झालं? सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सनं...

या सामन्यात पुन्हा एकदा सुर्यकुमार यादव अपयशी ठरला. या सामन्यात तर त्याला खाते ही खोलता आले नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला अर्थदीप सिंगने बाद केले. कॅप्टन हार्दीक पंड्याला ही चमकगार कामगिरी करता आली नाही. तो 12 चेंडूत 14 धावा काढून बाद झाला. त्याचा सीमा रेषेजवळ बार्टलेटने एक जबरदस्त कॅच पकडला. शेरफेन रदरफॉर्ड, तिलक वर्मा यांनी ही निराशा केली. त्यांना ही चांगली धावसंख्या उभारता आली नाही. ते स्वस्त्यात तंबूत परतले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने भेदक मारा करत 3 बळी टिपले.