- टाटा आयपीएल २०२६ चा १९ वा हंगाम २६ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे
- मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या दोन होम मॅचेससाठी तिकीट विक्री १९ मार्चपासून सुरू होणार आहे
- मुंबई इंडियन्सच्या सामन्यांची तिकीटं BookMyShow, District by Zomato, अधिकृत वेबसाईट वरून बुक करता येतील
IPL 2026 Tickets: आयपीएलचा थरार 26 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांना 'टाटा आयपीएल 2026' चे वेध लागले आहेत. TATA IPL 2026 च्या 19 व्या हंगामाची प्रतिक्षा आता संपणार आहे. बीसीसीआयने (BCCI) पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हा हंगाम 26 मार्च ते 31 मे 2026 या कालावधीत रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांसाठी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या दोन होम मॅचेसच्या तिकीट विक्रीचा संपूर्ण प्लॅन शेअर केला आहे. यामध्ये 29 मार्च रोजी होणारी 'MI विरुद्ध KKR' आणि 12 एप्रिल रोजी होणारी 'MI विरुद्ध RCB' या सामन्यांच्या तिकिटांचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्सच्या सामन्यांची तिकिटे तुम्ही BookMyShow, District by Zomato, MI ची अधिकृत वेबसाईट किंवा Google Pay द्वारे बुक करू शकता. 19 मार्चपासून टप्प्याटप्प्याने ही विक्री सुरू होणार आहे. तुम्हालाही वानखेडेवर जाऊन 'मुंबई-मुंबई'चा जयघोष करायचाय? तर तयार व्हा! मुंबई इंडियन्सने त्यांच्या होम मॅचेसच्या तिकिटांची माहिती शेअर केली आहे. 29 मार्चला कोलकाता आणि 12 एप्रिलला बेंगळुरूविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे गूगल पे असेल किंवा तुम्ही एमआयचे सदस्य असाल, तर तुम्हाला तिकीट मिळवण्यात अडचणी येणार नाही. 23 मार्चला संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्वांसाठी तिकीट विक्री सुरू होईल. यंदा आरसीबीचे तिकीट फक्त त्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे, तर इतर टीम्ससाठी झोमॅटो आणि बुक माय शोचा आधार घ्यावा लागेल.
टाटा आयपीएल 2026 च्या 19 व्या हंगामासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असून मुंबई इंडियन्सने वानखेडेवरील सामन्यांच्या तिकीट विक्रीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. एमआय गोल्ड आणि सिल्वर सदस्यांना विशेष सवलत आणि लवकर बुकिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा 'डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो' या नवीन प्लॅटफॉर्मवरूनही अनेक संघांच्या घरच्या सामन्यांचे बुकिंग करता येणार आहे. चाहत्यांनी अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरूनच तिकिटे खरेदी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तिकीट विक्रीचे वेळापत्रक (Schedule):
- सुरूवात- 19 मार्च 2026, 12:00 IST
- समाप्त- 21 मार्च 2026, 12:00 IST
टिकट विक्रीया दूसरा टप्पा- एमआई गोल्ड, सिल्वर आणि जूनियर सदस्यांना तात्काळ प्रवेश प्रक्रीया
- सुरूवात- 21 मार्च 2026, 15:00 IST
- समाप्त- 22 मार्च 2026, 15:00 IST
टिकट विक्रीचा तीसरा टप्पा - एमआई ब्लू सदस्य आणि बीएमएस सदस्यांसाठी सहज तिकीट
- सुरूवात 22 मार्च- 2026, 17:00 IST
- समाप्त- 23 मार्च 2026, 17:00 IST
तिकीट विक्रीचा चौथा टप्पा- विक्री सर्व सामान्य जनतेसाठी खुली असणार आहे
- सुरूवात- 23 मार्च 2026, संध्याकाळी 6:00 वाजव्यापासून उपलब्ध राहील
जर तुम्ही मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चे चाहते असाल, तर तुम्हाला BookMyShow या ॲप किंवा वेबसाईटचा वापर करावा लागेल. या चारही संघांच्या घरच्या मैदानांवरील (Home Matches) सर्व सामन्यांची तिकिटे याच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. झोमॅटोच्या नवीन District या प्लॅटफॉर्मवर चेन्नई सुपर किंग्स (CSK), गुजरात टायटन्स (GT), दिल्ली कॅपिटल्स (DC), किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या पाच संघांच्या होम मॅचेसची तिकिटे बुक करता येतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आरसीबीच्या सामन्यांची तिकिटे कोणत्याही तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर मिळणार नाहीत. ती फक्त आणि फक्त आरसीबीच्या अधिकृत वेबसाईटवरच उपलब्ध असतील.
Paltan, it's time to plan your Wankhede matchdays! 🤩
— Mumbai Indians (@mipaltan) March 17, 2026
MI Home Match tickets for #TATAIPL 2026 will go live in phases. Check the details and mark your calendars! 🎟️🗓️👇🏻https://t.co/gZ5ZV9q7Jw pic.twitter.com/ytWtPnlpCT
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world