
Mumbai Local Ticket on Whatsapp : मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकल ट्रेनच्या तिकीटांसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास आता लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वे लवकरच व्हॉट्सअॅपवर तिकीट काढण्याची सुविधा पुरवण्याच्या विचारात आहे. रेल्वेने याबाबत नुकतीच काही इच्छुक संस्थांसोबत बैठक घेतली असून, लवकरच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वे आपली तिकीट सिस्टम पूर्णपणे डिजिटल आणि कॅशलेस करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या सुमारे 25 टक्के प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढतात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच दिशेने एक पाऊल पुढे टाकून रेल्वे प्रशासनाने व्हॉट्सअॅप तिकीट प्रणालीचा विचार सुरू केला आहे. मेट्रो ट्रेनमध्ये ही प्रणाली आधीपासूनच यशस्वी ठरली आहे, जिथे सुमारे 67 टक्के प्रवासी या सुविधेचा वापर करतात.
(नक्की वाचा- पतीचा विकृत कारनामा! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले, ब्लॅकमेल करत डान्सबारमध्ये नाचवले, पुढे...)
कशी असेल ही प्रक्रिया?
रेल्वेची ही सुविधा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना तिकीट खिडकीजवळ किंवा रेल्वे स्टेशनवर लावलेला विशिष्ट क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. हा कोड स्कॅन केल्यानंतर थेट व्हॉट्सअॅप चॅट सुरू होईल. चॅटमध्ये 'Hi' मेसेज पाठवल्यानंतर प्रवाशांना तिकीट बुकिंगचे पर्याय दिसतील. आवश्यक माहिती भरल्यानंतर आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरल्यानंतर प्रवाशांना थेट व्हॉट्सअॅपवरच डिजिटल तिकीट उपलब्ध होईल.
(नक्की वाचा - Nashik Crime : 75 गुन्ह्यातील चेन स्नॅचरवर धाडसी नणंद-भावजयीची झडप, मंगळसूत्र चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)
या सुविधेमुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही आणि प्रवासाला निघताना लगेच तिकीट काढता येईल. या प्रणालीमुळे वेळेची बचत होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world