IPL 2026 Updated Points Table After CSK beat MI: संजू सॅमसनच्या नाबाद शतकाच्या आणि अकिला होसेनच्या नेतृत्वाखालील दमदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६ च्या ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १०३ धावांनी धुव्वा उडवला. घरच्या मैदानावर मुंबईला पराभूत करून चेन्नईने आपला नेट रन रेट सुधारला आहे, तर मुंबईचा प्लेऑफचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. चेन्नईच्या या विजयाने पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे.
IPL 2026, MI vs CSK : संजू सॅमनसची ऐतिहासिक सेंच्युरी, प्रतिष्ठेच्या लढतीत CSK चा मुंबईवर दमदार विजय
चेन्नईचा दणदणीत विजय, पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर!
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव देऊन चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत खळबळ उडवून दिली आहे. चेन्नई दोन गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचली आहे, तर पाच वेळा विजेती मुंबई स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. संजू सॅमसनच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर चेन्नईने पहिल्या २० षटकांत २०७ धावा केल्या. त्यानंतर, मुंबईचे फलंदाज अकिला होसेनच्या भेदक गोलंदाजीसमोर पूर्णपणे शरण गेले आणि १०३ धावांवर गारद झाले.
मुंबईविरुद्धच्या विजयानंतर, चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत २ स्थानांची झेप घेतली आहे. ३ विजय आणि ४ पराभवांसह ७ सामन्यांतून ६ गुण मिळवून चेन्नई आता ५व्या स्थानावर आहे. दिल्ली आणि गुजरात यांचेही प्रत्येकी ६ गुण आहेत, परंतु ६ चेंडू शिल्लक असताना १०३ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यामुळे चेन्नईच्या रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, ज्यामुळे ते ५व्या स्थानावर आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्स ८व्या स्थानावर असून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या धोक्यात आहे. २ विजय आणि ५ पराभवांसह ७ सामन्यांतून मुंबईचे ४ गुण आहेत.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची 'या' बॉलरपुढं शरणागती, मेडन ओव्हर खेळली आणि विकेटही गेली! सर्वत्र चर्चा )
६ सामन्यांतून ५ विजय आणि +१.४२० च्या नेट रनरेटसह पंजाब किंग्स ११ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ५ विजय आणि ७ सामन्यांतून १० गुणांसह राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. सहा सामन्यांतून चार विजयांसह बंगळूरु तिसऱ्या स्थानावर आहे, तर सात सामन्यांतून चार विजय आणि आठ गुणांसह हैदराबाद आठव्या स्थानावर आहे. कोलकाता नाइट रायडर्स गुणतालिकेत तळाशी आहेत. सात सामन्यांमधून कोलकाताने एक विजय मिळवला असून तीन गुण मिळवले आहेत. कोलकाताला पाच पराभव पत्करावे लागले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world