IPL Most Sixes: ना रोहित ना कोहली, IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचे रेकॉर्ड कुणाच्या नावावर?

रचिन रवींद्र, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, नितिश कुमार रेड्डी, हर्षित राणा या सारख्या खेळाडूंवर लक्ष असणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Most Sixes in IPL: कोलकाता नाइट राइडर्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु यांच्या सामन्याने IPL 2025 ची सुरूवात होणार आहे. यावेळच्या IPL मध्ये रचिन रवींद्र, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, नितिश कुमार रेड्डी, हर्षित राणा या सारख्या खेळाडूंवर लक्ष असणार आहे. या खेळाडूंनी गेल्या काही दिवसांत जबरदस्त खेळ केला आहे. या शिवाय रोहित आणि विराटच्या खेळावरही सर्वांचे लक्ष असेल. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांची आतषबाजी व्हावी अशी चाहत्यांची इच्छा आहे.षटकारांचा विषय निघताच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार कुणी मारलेत ते तुम्हाला माहित आहे का?  हे रेकॉर्ड कुणाच्या नावावर आहे हे आपण पाहाणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोहित शर्मा, विरोट कोहली यांच्या बॅटमधून IPL मध्ये चौकार आणि षटकारांची बरसात झाली आहे. पण सर्वाधिक षटकार मारण्याचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर नाही हे ही तितकेच खरे आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेल IPL मध्ये तीन वेगवेगळ्या संघाकडून खेळला आहे. त्यात त्याने 142 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने तब्बल 357 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे त्याच्या या षटकारांच्या आकड्याच्या अजूबाजूलाही कुणी फलंदाद नाही. गेल पंजाब, कोलकाता आणि बेंगलूरू संघाकडून खेळला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Virat Kohli : T20I क्रिकेटमधील निवृत्ती मागं घेण्यास विराट तयार, टीमसमोर ठेवली खास अट

ख्रिस गेल नंतर सर्वाधिक षटकार IPL मध्ये जर कुणी लगावले असतील तर ते नाव आहे रोहित शर्मा याचे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स कडून 257 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने एकूण 280 षटकार लगावले आहेत. रोहित शर्माने या आयपीएलमध्ये जर का 20 षटकार लगावले तर तो 300 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. रोहित शर्माच्या पुढे ख्रिस गेले आहे. गेलने 357 षटकार आयपीएलमध्ये लगावले आहेत.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का, बुमराहबाबत आली काळजीची बातमी

गेल, रोहित नंतर विरोट कोहली षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएल चे 252 सामने खेळले आहेत. त्यात त्याने जवळपास 272 षटकार ठोकले आहेत. रोहित पेक्षा विराट 8 षटकार मागे आहे. दोघांमध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे. रोहितला मागे टाकण्याचा प्रयत्न यावेळी विराटचा असेल. या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं ही नाव आहे. धोनीने 264 सामन्यात 252 षटकार ठोकले आहेत. एबी डिविलियर्स याने ही जवळपास 251 षटकार आयपीएलमध्ये ठोकले आहेत. 

Advertisement