Jemimah Rodrigues Viral Video: भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक 2025 जिंकल्यानंतर संघातील खेळाडूंच्या कामगिरीचे आणि संघर्षाचे अनेक पैलू समोर येत आहेत. याच दरम्यान भारताची स्टार क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज हिचा एक जुना व्हिडिओ (Video) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तो व्हायरल ही होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या 'बीअरबायसेप्स' पॉडकास्टमधील या मुलाखतीमध्ये तिने महिला क्रिकेटपटूंना मासिक पाळीदरम्यान (Menstrual Cycle) मैदानावर कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे. तिचे याबाबतचे विधान सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तिने याबाबत जे सांगितले ते ऐकून तुम्ही ही म्हणाल अरे बापरे.
जेमिमा रॉड्रिग्जने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 134 चेंडूंमध्ये 127 धावांची विक्रमी खेळी केली. तिच्या खेळी मुळे भारताला विजय मिळाला होता. त्यानंतर जेमिमाचे देशभरात कौतूक झाले. याच कामगिरीमुळे ती चर्चेत आली. ती इंटरनेटवर सर्च केली जावू लागली. त्याच वेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जेमिमाने महिला क्रिकेटपटूंच्या 'अदृश्य' संघर्षावर प्रकाश टाकला आहे. ती म्हणाली, मासिक पाळीच्या वेदना (Pain) इतक्या तीव्र असतात की कधीकधी चालणेही कठीण होते. या काळात शरीरातील ऊर्जा (Energy) कशी कमी होते आणि त्याचा कामगिरीवर कसा परिणाम होतो, याबद्दल तिने सांगितले.
या तीव्र वेदना आणि शारीरिक आव्हानांवर मात करूनही महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. यामागची त्यांची मानसिक शक्ती (Mental Strength) आणि लवचिकता जेमिमाने अधोरेखित केली. आम्हाला हा खेळ खूप आवडतो, त्यामुळे आम्ही वेदना सहन करून पुढे जातो आणि देशासाठी खेळतो असे ती म्हणाली. अशा परिस्थितीत महिला खेळाडू पेनकिलर (Painkiller) म्हणजेच वेदनाशामक गोळ्या खाऊन खेळतात. जेमिमाच्या या विधानामुळे महिला खेळाडूंचा दृढनिश्चय आणि त्यागाची भावना स्पष्ट होते, तसेच क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या समस्यांवर चर्चा सुरू झाली आहे.
मासिक पाळीच्या वेळी महिला खेळाडूंना प्रचंड वेदना होत असतात. अशा स्थिती खेळणे तेवढे शक्य नसते. क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळावर लक्ष केंद्रीत करावे लागते. अशा वेळी पेनकिलर खाण्या शिवाय पर्याय नसतो. त्यामुळे आम्ही त्याचाच वापर करतो. कारण आम्ही देशासाठी खेळतो. ते आमचे एक स्वप्न असते असं जेमिमा हिने या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. जेमिमा ही क्रिकेट वर्ल्डकप विजयानंतर सर्वात जास्त चर्चेत आहे. तिचे अनेक व्हिडीओ ही व्हारयल झाले आहे. त्यात तिचे गिटार वाद्य असेल किंवा तिचा डान्स असेल हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.