Jemimah Rodrigues Dance Video: टीम इंडियाची बॅटर जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) तिच्या धडाकेबाज खेळासाठी ओळखली जाते. आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप सीरिजमध्ये तिने मैदान गाजवले. पण खेळाव्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्सचे कित्येक डान्स व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यापैकीच तिच्या एका खास व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.
जेमिमा रॉड्रिग्सचा गुलाबी साडी गाण्यावर धमाकेदार डान्स | Jemimah Rodrigues Dance On Gulabi Sadi Song
सोशल मीडियावर जेमिमा रॉड्रिग्सचे एकापेक्षा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप सीरिजदरम्यान स्टेडिअमवरील तिच्या डान्सनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. संजू राठोडच्या जबरदस्त गाजलेल्या 'गुलाबी साडी' या मराठमोळ्या गाण्यावर जेमिमाने मैदानातच ठेका धरला आणि तिचा डान्स कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. "गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ" या गाण्यावर तिने लय भारी डान्स केलाय.
रितेश देशमुखच्या वेड सिनेमातील 'मला वेड लावलं तिने वेड लावलंय' गाण्यावरील रील | Mala Ved Lavlay Tine Ved Lavlay Song
(नक्की वाचा: Womens World Cup 2025: विश्वविजेत्या लेकींसाठी खजिना खुला! BCCIची सर्वात मोठी घोषणा, महिला ब्रिगेड मालामाल)
कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी गाण्यावरील रील व्हायरल| Kamal Zali Swapnat Ali Rani Mukerji Nati Song Viral
रील्सव्यतिरिक्त क्रिकेट मॅचदरम्यानही जेमिमाचे डान्स करतानाचेही कित्येक व्हिडीओ इंटरनेटवर पाहायला मिळतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world