Jemimah Rodrigues Favourite Seafood: टीम इंडियाची स्टार बॅटर जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) सध्या सोशल मीडिया स्टार झालीय. आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप सीरिजमध्ये जबरदस्त खेळी खेळल्यानंतर नेटकरी जेमिमाबाबतच्या छोट्यातील छोट्या गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. जेमिमाला काय खायला आवडते, क्रिकेटव्यतिरिक्त जेमिमाला काय करायला आवडते यासह तिचे जुने व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सर्च केले जात आहेत.
क्रिकेटशी संबंधित दौरे करुन घरी आल्यानंतर जेमिमाला तिच्या आईने केलेला डाळ-भात, बोबींल फ्राय आणि कोळंबी हे मासे खायला प्रचंड आवडतात.
घरच्या घरी बोबींल फ्राय कसे करायचे? जाणून घेऊया सोपी रेसिपी
बोबींल फ्राय रेसिपी | Bombil Fry Step By Step Recipe
बोबींल व्यवस्थित स्वच्छ करुन घ्या आणि ते मधून कापा.
बोंबील मासा मॅरीनेड करण्यासाठी सामग्री | Bombil Fry Recipe Video
- आवश्यकतेनुसार मीठ
- हळद : 1/4 चमचा
- धणे पूड : एक चमचा
- लाल तिखट पावडर : दोन चमचे
- आले-लसूण पेस्ट : एक चमचा
- कोकम ज्युस किंवा लिंबाचा रस : एक चमचा
- स्वच्छ केलेले बोबींल या मिश्रणामध्ये मॅरीनेड करा.
बोंबील फ्राय करण्यासाठी पीठ
- रवा : एक कप
- तांदळाचे पीठ : एक कप
- आवश्यकतेनुसार मीठ
- लाल तिखट पावडर : एक चमचा
मॅरीनेड केलेले बोबींलवर पीठ लावा आणि तेलामध्ये फ्राय करुन घ्या.
गरमागरम बोबींल फ्राय तयार आहे.
बोबींल फ्राय रेसिपी दुसरी पद्धत | Bombil Fry Homemade Recipe
बोबींल स्वच्छ करुन घ्या. त्यातील काटा काढा आणि स्वच्छ केलेल्या बोबींलवर लाटणं फिरवा.
हळद, लाल तिखट मसाला, हिरवे वाटण, आगळ, मीठ ही सामग्री वापरुन बोबींल मॅरीनेड करा.
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues Dance Video: दिसते मी भारी...! जेमिमा रॉड्रिग्सने गुलाबी साडी या मराठी गाण्यावर मैदानात धरला ठेका)
त्यानंतर तांदळाचे पीठ, रवा, हळद, लाल तिखट मसाला, मीठ एकत्रित करा. बोबींलवर दोन्ही बाजूने पीठा लावा आणि तेलामध्ये मासे फ्राय करून घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
