Arjun Tendulkar Video: क्रीडा विश्वात 'क्रिकेटचा देव' म्हणून प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यात तो एका मुलाला बॉलवर ऑटोग्राफ (Autograph) देताना दिसत आहे, या क्षणाने सर्वांची मने देखील जिंकली. पण यापूर्वी स्टेडिअममध्ये मोठी गोष्ट देखील घडली. सामन्यादरम्यान अर्जुनच्या एका शॉटमुळे हा मुलगा जखमी झाला होता. त्या वेळी अर्जुन काहीच बोलला नाही आणि त्याने आपले पूर्ण लक्ष मॅचवर केंद्रित ठेवले. पण मॅच संपताच तो थेट त्या मुलाजवळ गेला आणि त्याने त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. या दरम्यान ज्या बॉलमुळे मुलाला दुखापत झाली होती, त्याच बॉलवर अर्जुनने ऑटोग्राफ देत त्या मुलाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलवले.
मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरचा जलवा पाहायला मिळाला
या घटनेपूर्वी मॅचदरम्यान अर्जुन तेंडुलकरचा चांगलाच जलवा पाहायला मिळाला. एआरसीएस अंधेरी टीमकडून खेळताना त्याने आधी बॉलिंग करत तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर बॅटिंगमध्येही त्याने उत्कृष्ट खेळ दाखवला. टीमसाठी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला जाऊन तो एकूण 34 बॉल्सची खेळी खेळला. यादरम्यान 194.12 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 66 रन्स करण्यात तो यशस्वी ठरला. या खेळीत क्रिकेटप्रेमींना त्याच्या बॅटमधून 4 फोर आणि 5 सिक्स पाहायला मिळाले. या सामन्यातील मॅच-विनिंग कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.
(नक्की वाचा : Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली? : वैभव सूर्यवंशी)
अर्जुन तेंडुलकरने काय केले पाहा VIDEO
(नक्की वाचा: Vaibhav Sooryavanshi News: 'वैभव सूर्यवंशीकडून झटपट चमत्कारांची अपेक्षा करू नका, सौरव गांगुली असं का म्हणाला? सामन्याच्या निकालाबाबत बोलायचे झाले तर, वानखेडे स्टेडियमवर टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना बांद्रा ब्लास्टर्सची टीम 20 ओव्हरर्संमध्ये 9 आऊट 144 रन्स करू शकली. विरोधी टीमने दिलेले 145 रन्सचे लक्ष्य एआरसीएस अंधेरीच्या संघाने 13.5 ओव्हर्समध्ये केवळ 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना अर्जुन तेंडुलकरने 34 बॉल्समध्ये 66 धावांची नाबाद हाफ सेंच्युरी खेळी खेळली. त्याच्याशिवाय मुशीर खानने नाबाद 54 रन्सचे योगदान दिले, तर दिव्यांश सक्सेना 26 रन्स करण्यात यशस्वी ठरला.एआरसीएस अंधेरी टीमचा विजय