Vaibhav Sooryavanshi News: इंडियन क्रिकेट टीममध्ये एण्ट्री करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर अपेक्षांचे ओझे टाकू नका, त्याला आपला खेळ अधिक चांगला करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने रविवारी (7 जून) व्यक्त केले. वैभवची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी तसेच जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे. या निवडीसह वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) हा टीम इंडियामध्ये निवडला गेलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
गांगुली म्हणाला, "त्याला त्याच्या पद्धतीने खेळू द्या"| Ganguly Says, "Leave Him Alone And Let Him Play"
एका कार्यक्रमादरम्यान PTIशी बोलताना सौरव गांगुलीने म्हटलं की, "आपण सध्या त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडलं पाहिजे. तो केवळ 15 वर्षांचा आहे. मला नाही वाटत की तो दबावाची फारशी पर्वा करेल, कारण आयपीएल (IPL) मध्येही आपण हेच पाहिलं आहे. पण निश्चितच भारतासाठी खेळणं ही वेगळी गोष्ट आहे आणि तो अशा दौऱ्यावर जात आहे जिथली खेळपट्टी खूप वेगळी असेल."
(नक्की वाचा : Vaibhav Sooryavanshi Video : 'मला नाव सांगायची गरज नाही'; नाकाबंदी सांगत वैभव सूर्यवंशीला रोखलं, नाव विचारलं अन्..)
ब्रिटनमधील आव्हानांवर गांगुलीने केलं भाष्य | Ganguly Highlights Challenges Of UK Conditions
ब्रिटनमधील परिस्थिती IPLमधील वातावरणापेक्षा बरीच वेगळी असेल आणि सूर्यवंशीला त्यानुसार आपल्या खेळात बदल करण्याचे आव्हान असेल, याकडे गांगुलीने लक्ष वेधले. पुढे तो असेही म्हणाला की, तिथे बॉल अधिक सीम होईल, जास्त उसळी मिळेल आणि नवीन बॉलला जास्त मूव्हमेंट मिळेल. त्यामुळे खेळ थोडा वेगळा असेल, पण मला वाटते की त्याच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. म्हणून त्याला वेळ द्या. त्याने लगेचच संपूर्ण जग जिंकून घ्यावं अशी अपेक्षा करू नका. त्याला खेळात जम बसवू द्या, कारण भारतातील अन्य खेळाडूंप्रमाणेच त्याच्यातही मोठी क्षमता आहे"
(नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा लहान भाऊ आशीर्वादची चर्चा का? वडिलांनी थेट सांगितलं)
एबी डिव्हिलियर्सनेही सूर्यवंशीचे केले कौतुक| AB de Villiers Applauds Suryavanshi's Inclusion
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा एक्स बॅटर एबी डिव्हिलियर्सने देखील वैभवच्या निवडीचे समर्थन केले आहे. एबी डिव्हिलियर्सच्या मते, वैभवच्या कमी अनुभवाचा विचार करून काळजी करण्याची अजिबात गरज नाही. डिव्हिलियर्स पुढे असंही म्हणाला, "तो अजून खूप लहान आहे, इंटरनॅशनल क्रिकेटसाठी तयार नाही किंवा त्याला आणखी अनुभवाची गरज आहे, असं म्हणणं खूप सोपं असतं. पण त्याने आपल्या चमकदार कामगिरीने हे सिद्ध करून दाखवलं आहे की तो इंडियन टी-20 टीममध्ये स्थान मिळवण्यास पूर्णपणे पात्र आहे. मी त्याच्या या यशासाठी खूप आनंदी आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world