
MS Dhoni Latest Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. धोनी बॅट घेऊन ज्या स्टेडियममध्ये गेला, त्या वेळी पिचजवळ एका लिटल विकेटकीपरने असं काही केलं..जे पाहून सर्वांचाच ऊर अभिमानाने भरला असेल.भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी 9 ऑक्टोबर 2025 रोजी नव्यानं उभारलेल्या वेल्लाम्मल क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला होता. त्यावेळी धोनीने मैदानात एन्ट्री करताच एका लिटल विकेटकीपरने धोनीचा आशीर्वाद घेत त्याचं स्वागत केलं. लिटल प्लेयरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच क्रिकेटप्रेमींनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
वेलाम्मल क्रिकेट स्टेडियमसाठी 325 कोटी रुपयांचा खर्च
मदुरै येथे नव्यानं उभारलेलं वेलाम्मल क्रिकेट स्टेडियम वेलाम्मल एज्युकेशन ट्रस्टच्या आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून उभारण्यात आलं आहे. हे स्टेडियम उभारण्यासाठी जवळपास 325 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 7300 इतकी आहे. भविष्यात या स्टेडियममध्ये 20000 प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था करण्याची योजना आहे.
धोनीला पाहताच चाहत्यांनी विमानतळावर काय केलं?
धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी लगबग सुरु असते.धोनीसोबत फोटो काढण्यासाठीही अनेक चाहते उत्सुक असतात. पण यावेळी धोनी विमानतळावर पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी सुरक्षा पुरवली होती. धोनी येथे कॅज्युअल आऊटफीटमध्ये आला होता. धोनीनं काळ्या रंगाची टी शर्ट आणि जीन्स घातली होती. डोळ्यांवर चष्मा लावल्याने धोनी जबरदस्त लूकमध्ये झळकला होता.
A little boy touched MS Dhoni's feet in the stadium 🥹❤️ pic.twitter.com/eRc94Fl30D
— ` (@WorshipDhoni) October 9, 2025
धोनी चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडणार?
एम एस धोनीच्या एका व्हायरल फोटोमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. धोनीनं सीएसकेला आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळे धोनी सीएसकेसाठी किंग मेकर बनला होता. पण धोनीनं मुंबई इंडियन्ससी ट्रेनिंगची जर्सी घातल्याचा फोटो व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. धोनी यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world