मुंबई आणि दिल्ली यांच्यातला सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला. दिल्लीचा 193 धावात ऑलआऊट झाला. मुंबईचा 13 धावांनी विजय झाला. मुंबईने दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. जेक फ्रेसर हा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. त्याला दीपक चहरने बाद केले. त्यानंतर अबिशेक पोरेल आणि करुण नायरने दिल्लीचा डाव सावरला. पोरेल 25 चेंडूत 33 धावा काढून बाद झाला. पण करुण नायरने जबरदस्त खेळ करत 40 चेंडूत 89 धाला ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 12 चौकार ठोकले. त्याची शतक थोडक्यात हुकले. त्याला मिचेल सँटनरने बाद केले. नायर बाद झाला तेव्हा दिल्लीच्या 12 षटकात 135 धावा झाल्या होत्या. त्यानंतर कॅप्टन अक्षर पटेल आणि ट्रिस्टन स्टब्स हे जास्तवेळ खेळपट्टीवर थांबू शकले नाहीत. के.एल राहुलला ही मोठी खेळी करता आली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात आज रविवारी आयपीएलचा सामना रंगला. दिल्लीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने पाच षटकात 47 धावांची सलामी दिली. रोहित शर्माला मात्र या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. तो 12 बॉल मध्ये 18 धावा काढून बाद झाला. त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. त्याला विपराज निगमने आऊट केले. त्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादव आणि रायन रिकलटन यांनी डाव सावरला. रायन याने 25 चेंडूत 41 धावा केल्या. त्यात त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. त्याला कुलदीप यादवने बाद केले.
तर सुर्यकुमार यादवने 28 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्यात त्याने पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. कॅप्टन हार्दीक पांड्याला मात्र त्याच्या नावाला साजेशी खेळी करता आली नाही. तो दोन धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी मुंबईची धुरा सांभाळली. शेवटच्या षटकात या दोघांनी जोरदार फटकेबाजी करत मुंबईचा स्कोर 200 च्या पार नेला. तिलक वर्माने 33 चेंडूत 59 धावा केल्या. त्यात तीन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर नमन धीरने 17 चेंडूत 38 धावांची आतषी खेळी केली. त्याने दोन षटकार आणि तीन षटकार ठोकले. यांच्या खेळी मुळे मुंबईने 205 धावा केल्या. मुंबईचे पाच फलंदाज बाद झाले.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : लखनौनं रोखली गुजरातची घौडदौड, पॉईंट टेबलमध्ये केली उलथापालथ
दिल्लीकडून विपराज निगम आणि कुलदीप यादव यांनी दोन दोन विकेट घेतल्या. तर मुकेश कुमारने एकाला बाद केले. मिचेल स्टार्क, कॅप्टन अक्षर पटेल आणि मोहित शर्मा यांना एकही फलंदाज बाद करता आला नाही. मिचेल स्टार्कने तीन षटकात सर्वाधिक 43 धावा काढल्या. मोहित शर्माने ही तीन षटकात तब्बल 40 धावा दिल्या. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 206 धावांचे लक्ष दिले आहे. मुंबईकडून करण शर्माने तीन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमरा, दीपक चाहर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. दिल्लीचे तीन खेळाडू रनआऊट झाले.