Who Is Narayan Jagadeeshan : आशिया कपचा थरार सुरु असतानाच बीसीसीआयने टीम इंडियाची वेस्टइंडिज सीरिजसाठी घोषणा केलीय. भारताचा रेड बॉल क्रिकेटचा दिग्गज खेळाडू करुण नायरला या सीरिजमध्ये डच्चू देण्यात आलाय. तर आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या देवदत्त पड्डीकलची या सीरिजसाठी एन्ट्री झाली आहे.अशातच बीसीसीआयने टेस्ट टीममध्ये एका धडाकेबाज फलंदाजाचाही समावेश केला आहे. ज्याने वनडेत रोहित शर्माचा विश्वविक्रमही मोडला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने तामिळनाडूच्या 29 वर्षीय विकेटकीपर फलंदाज नारायण जगदीशनला संधी दिलीय. वेस्टइंडिज विरोधात होणाऱ्या दोन टेस्ट सामन्यांमध्ये नारायण जगदिशनला विकेटकीपर म्हणून बीसीसीआयने निवडलं आहे. जगदीशन विकेटकीपर-फलंदाज आहे. तो तामिळनाडूसाठी डोमॅस्टिक क्रिकेट खेळतो. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईड रायडर्ससाठीही खेळला आहे. जगदिशनने 2026 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
वनडेत रोहित शर्माचा 264 धावांचा मोठा रेकॉर्ड मोडला
वनडे क्रिकेटमध्ये (50 ओव्हर फॉर्मेट) मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर नाहीय.तर भारताचा तामिळनाडूचा खेळाडू नारायण जगदिशनच्या नावावर आहे.जगदीशनने बंगळुरुत 21 नोव्हेंबर 2022 रोजी वनडे क्रिकेट फॉर्मेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. नारायण जगदीशनने 21 नोव्हेंबर 2022 रोजी विजय हजारे ट्रॉफीत अरुणाचल प्रदेश संघाविरोधात एका सामन्यात 141 चेंडूत 277 धावांची तुफानी खेळी खेळली होती.
नारायण जगदीशनने या सामन्यात 196.45 च्या स्ट्राईक रेटने आक्रमक फलंदाजी करून 25 चौकार आणि 15 षटकार ठोकले होते. तर रोहित शर्माने वर्ष 2014 मध्ये श्रीलंके विरोधात वनडेत आंतरराष्ट्रीय सामन्यात 264 धावांची खेळी केली होती. नारायण जगदीशनने 50 ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक 277 धावा कुटल्या अन् रोहितला पिछाडीवर टाकलं.
नारायण जगदिशनचे रेकॉर्ड्स
नारायण जगदीशनने तामिळनाडूसाठी 54 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 50.49 च्या सरासरीनं 3686 धावा केल्या. यामध्ये 11 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नारायण जगदिशनने 321 इतका सर्वाधिक स्कोअर केला आहे. लिस्ट ए च्या 64 सामन्यांमध्ये नारायण जगदीशनने 46.23 च्या सरासरीनं 2728 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये नारायण जगदिशनने 277 धावांचा हाएस्ट स्कोअर केला आहे.
तर टी-20 च्या 66 सामन्यांमध्ये जगदीशनने 31.38 च्या सरासरीनं 1475 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तसच टी-20 फॉर्मेटमध्ये जगदिशनने सर्वाधिक 88 धावा केल्या आहेत. डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये जगदीशनने 209 झेल टीपले आहेत, तर 29 वेळा स्टम्पिंगही केली आहे.तसच त्याने 13 आयपीएल सामन्यांमध्ये 162 धावा केल्या आहेत. 2024-25 च्या रणजी ट्रॉफी सीजनमध्ये नारायण जगदीशनने तामिळनाडूसाठी 8 सामन्यांमध्ये 674 धावा केल्या होत्या.