India vs Pakistan: 'ना नजरेला नजर, ना हात मिळवला', टॉस वेळी सूर्यकुमार यादव, सलमान आगा यांच्यात काय घडलं?

भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी स्पर्धेतील आपले पहिले सामने जिंकले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

India vs Pakistan Asia Cup 2025 No Hand Shake Between Captain: पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने रविवारी एशिया कप (IND vs PAK Asia Cup 2025) ग्रुप ए च्या सामन्यात भारता विरुद्ध टॉस जिंकला. त्यानंतर त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये  विजय मिळवून आले आहेत. त्यांनी एकच प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणात खेळल्या जात असलेल्या एशिया कप सामन्यात टॉसदरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी ना एकमेकांकडे पाहिले, ना हस्तांदोलन केले. क्रिकेट सामन्यांमध्ये टॉसच्या वेळी कर्णधारांनी हस्तांदोलन करणे ही एक प्रथा मानली जाते. पण यावेळी तसे झाले नाही. 

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाला, "आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत, खूप उत्साहित आहोत. खेळपट्टी संथ वाटत आहे. प्रथम फलंदाजी करून धावा बनवायच्या आहेत. आम्ही जवळजवळ 20 दिवसांपासून येथे आहोत आणि परिस्थितीची सवय झाली आहे." भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, "आम्ही प्रथम गोलंदाजी करू इच्छितो, आणि यामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्ही फक्त एक पिच सोडून खेळलो होतो, खेळपट्टी चांगली होती आणि रात्री फलंदाजीसाठी ती अधिक चांगली होती. तिथे ओलावा आहे, त्यामुळे दव पडण्याची शक्यता आहे. संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही."

नक्की वाचा - IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानच्या 20 ओव्हर्समध्ये 127 धावा, भारताला 128 धावांचे लक्ष्य

टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचे पारडे पाकिस्तानवर खूप जड आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने 10 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान फक्त 3 सामने जिंकू शकला आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी स्पर्धेतील आपले पहिले सामने जिंकले आहेत. भारताने UAE ला तर पाकिस्तानने ओमानला हरवले होते.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. पहलगाम हल्ल्यानंतर या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची चर्चा होती, परंतु शेवटी दोन्ही संघ समोरासमोर उभे आहेत.

संघ:

भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

Advertisement

पाकिस्तान: साहिबजादा फरहान, सॅम अयूब, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, सूफियान मुकीम, अबरार अहमद.