
Pakistan-Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Pakistan-Afghanistan) यांच्यातील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष (Military Conflict) अधिकच चिघळला आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या ठिकाणांवर इस्लामाबादने हल्ला केल्यानंतर गेल्या आठवड्यात हा संघर्ष सुरू झाला. दोन्ही देशांमध्ये बुधवारी रात्री शस्त्रसंधीवर (Ceasefire) सहमती झाली असतानाच, पाकिस्तानने शुक्रवारी रात्री पुन्हा अफगाणिस्तानवर हवाई हल्ले (Air Strikes) केले.
पाकिस्तानचा हल्ला, 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू
पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात (Paktika Province) एअर स्ट्राईक केले, ज्यात रहिवासी घरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात अफगाणिस्तानच्या स्थानिक क्रिकेट समुदायातील खेळाडूंचाही समावेश आहे. कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन स्थानिक क्लब क्रिकेटपटूंनी आपले प्राण गमावले. याशिवाय, चार स्थानिक खेळाडू जखमी झाले आहेत. मृत क्रिकेटपटूंसह एकूण पाचहून अधिक नागरिकांचा या हल्ल्यात बळी गेला आहे. हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराना येथील एका स्थानिक स्पर्धेत भाग घेऊन अरगुन जिल्ह्याकडे परतले असताना ही दुःखद घटना घडली.
क्रिकेट बोर्डाने घेतला मोठा निर्णय
या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि मृत खेळाडूंना 'जमिनी पातळीवरील नायक' (Ground Heroes) असे संबोधले. तसेच, या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये होणारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबतची त्रिकोणीय टी-२० मालिका (Tri-Series) रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Statement of Condolence
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 17, 2025
The Afghanistan Cricket Board expresses its deepest sorrow and grief over the tragic martyrdom of the brave cricketers from Urgun District in Paktika Province, who were targeted this evening in a cowardly attack carried out by the Pakistani regime.
In… pic.twitter.com/YkenImtuVR
अफगाणिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी (Fazalhaq Farooqi) याने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्याने लिहिले, "या अत्याचारी लोकांनी निरपराध नागरिक आणि आमच्या स्थानिक क्रिकेटपटूंचे केलेले हत्याकांड हे घृणास्पद कृत्य आहे. अल्लाह शहीदांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. खेळाडू आणि नागरिकांची हत्या करणे हा सन्मान नव्हे, तर घोर अपमान आहे. अफगाणिस्तान अमर राहो!" या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला असून, शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world