Asia Cup 2025 India Vs Pakistan: पाकिस्तानला टीम इंडियाने रविवारी झालेल्या मुकाबल्यात पुन्हा एकदा सहजरित्या पराभूत केलं. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोनवेळा आमनेसामने आले होते आणि दोन्हीवेळा पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलोय. 21 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखत पराभव केला. या पराभावनंतरही पाकिस्तान या स्पर्धेत अद्याप टीकून आहे, मात्र त्यांची अवस्था मरतुकड्यासारखी झाली असून त्यांची एक चूक त्यांना महागात पडणार आहे.
नक्की वाचा: IND vs PAK: पाक खेळाडूचा माज ! हँडशेक वादानंतर आता 'गन सेलिब्रेशन'
पाकिस्तानची मरतुकडी अवस्था
21 सप्टेंबर रोजीचा भारताविरूद्ध स्वीकारावा लागलेला पराभवानंतरही पाकिस्तान या स्पर्धेत टीकून आहे. मात्र त्यांचा पुढचा मार्ग अत्यंत खडतर झाला आहे. आता त्यांना पुढील दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागणार आहेत. यासोबतच इतर संघ कशी कामगिरी करतात यावरही त्यांचे नशीब अवलंबून असणार आहे. पाकिस्तानचा पुढील सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध आहे. श्रीलंकेने आशिया कपमध्ये ग्रुप स्टेजमध्ये तीनही सामने जिंकून चांगली कामगिरी केली होती, परंतु सुपर 4 मध्ये बांगलादेशने त्यांना पराभूत केलं होतं. ही जखम अजूनही श्रीलंकेच्या संघाला त्रास देत आहे. श्रीलंकेच्या संघासाठीही मंगळवारचा सामना महत्त्वाचा असून कागदावर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या संघापेक्षा काकणभर सरस वाटतो आहे.
पाकिस्तानचा पुढचा सामना श्रीलंका आणि बांगलादेशविरूद्ध
पाकिस्तानला दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील, अन्यथा त्यांचे स्पर्धेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित होईल. जर पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला, तर गुरुवारी पाकिस्तानचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होईल. बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यास पाकिस्तानचा फायनलमधील प्रवेश जवळपास निश्चित होईल. कारण, या दोन्ही विजयांनी त्यांचे गुण वाढतील आणि त्यांची अंतिम फेरीतील जागा सुरक्षित होईल. पाकिस्तानसाठी चिंतेची बाब ही आहे की बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले नाहीत. बांगलादेशने सुपर 4 मध्ये एक विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेमध्ये कोणत्याही संघाला हरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हे दोन्ही सामने सोपे नाहीत.
नक्की वाचा: Asia Cup 2025: भारत-पाक सामन्याआधी पाकिस्तानचा 'पळपुटेपणा', 'त्या' प्रश्नांच्या भीतीने पत्रकार परिषद रद्द
भारतीय संघाचे फायनलमधील स्थान जवळपास निश्चित
आशिया कप 2025 च्या सुपर 4 स्टेजमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध शानदार विजयासह सुरुवात केली असली, तरी त्यांचे अंतिम फेरीतील स्थान अजून निश्चित झालेले नाही. फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारताला आणखी एक सामना जिंकावा लागेल. टीम इंडियाचा पुढील सामना बुधवारी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी त्यांचा सामना श्रीलंकेशी होईल. या दोनपैकी एका सामन्यात विजय मिळवला तरी, भारत अंतिम फेरीमध्ये सहज पोहोचू शकेल.