जाहिरात

Dhurandhar 2 च्या पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत प्रीती झिंटाने पाहिली IPL मॅच, लोक म्हणाले, "हे काय.."

रविवारी 19 एप्रिलला पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा सामना रंगला. पण या सामन्यात काही खास गोष्टीही पाहायला मिळाल्या.

Dhurandhar 2 च्या पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत प्रीती झिंटाने पाहिली IPL मॅच, लोक म्हणाले, "हे काय.."
Preity Zinta And Arjun Rampal Viral Post

Preity Zinta Latest News :  रविवारी 19 एप्रिलला पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा सामना रंगला. पण या सामन्यात काही खास गोष्टीही पाहायला मिळाल्या. या सामन्यात बॉलिवूड सेलिब्रिटींचं रियूनियन झाल्याचं समोर आलं. पंजाब किंग्जची मालकीन आणि अभिनेत्री प्रीती झिंटा आणि धुरंधर 2 मधील पाकिस्तानी अधिकारी अर्जुन रामपाल एकत्रित स्पॉट झाले. दोघांनीही हा सामना पाहण्याचा आनंद लुटला. अर्जुन रामपाल आणि प्रीती झिंटाने 2002 मध्ये दिल है तुम्हारा या चित्रपटात एकत्रित काम केलं होतं. अर्जुन रामपाल सध्याच्या घडीला धुरंधर 2 चित्रपटामुळे चर्चेत आहे. स्टेडियमच्या स्टँडमध्ये प्रीती आणि अर्जुन एकत्रित  दिसले.  त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

चाहत्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

प्रीती झिंटा पंजाबच्या संघाला चिअर अप करण्यात व्यग्र होती आणि तिच्या खास अंदाजात संघाचा झेंडा फडकवत होती. अर्जुन रामपालही तिच्या सोबत सामना पाहत होता. त्याच्याही हातात एक पंजाब किंग्जचा झेंडा होता. दोघांनाही या सामन्यात स्टेडियममध्ये जबरदस्त माहोल क्रिएट केला होता. दोघांचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा चित्रपट दिल है तुम्हाराच्या आठवणीही ताज्या केल्या आहेत.

नक्की वाचा >> Pune News: पुणे महापालिकेत मोठा घोटाळा? बोगस ATC परवानगीच्या आधारे उंच इमारतींना मंजुरी, विमान सुरक्षा धोक्यात

दोघांचेही पूर्वीचे आणि आताचे फोटो इंटरनेटवर चाहत्यांनी व्हायरल केले आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय की,"पंजाबच्या विजयानंतर प्रीती झिंटा आणि अर्जुन रामपाल आनंद लुटत आहेत.दिल है तुम्हाराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत." अन्य एका चाहत्यानं म्हटलंय, क्रिकेटच्या भन्नाट परिस्थितीत बॉलिवूडचा एक खरा अंदाज. दुसऱ्या चाहत्याने म्हटलंय,हे माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. त्या जमान्यात मला प्रीती आणि अर्जुनची जोडी खूप आवडायची. काही चाहत्यांनी तर त्यांच्या मैत्रिचं कौतुक केलं आहे. एकाने कमेंट करत म्हटलंय,मोठ्या पडद्यापासून ते स्टेडियमपर्यंत..हीच आहे खऱ्या मैत्रिची साथ"

नक्की वाचा >>Akola News: अकोल्यातील 'या' गावात बालविवाह उधळला, पथकाने बालिका आणि पालकांची भेट घेतली अन्..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com