जाहिरात

IPL 2026, PBKS vs LSG : 254 धावांचा डोंगर रचणाऱ्या पंजाब किंग्जचा दणदणीत विजय, लखनऊचे धुरंधर फलंदाज सपशेल फेल

आयपीएलचा 29 वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चंदीगढच्या महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमध्ये रंगला. लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

IPL 2026, PBKS vs LSG :  254 धावांचा डोंगर रचणाऱ्या पंजाब किंग्जचा दणदणीत विजय, लखनऊचे धुरंधर फलंदाज सपशेल फेल
PBKS vs LSG Today Match Result

PBKS vs LSG Match Updates : आयपीएलचा 29 वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चंदीगढच्या महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमध्ये रंगला. लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जने लखनऊच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्याने 37 चेंडूत 9 षटकार आणि 4 चौकार ठोकून 93 धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. कूपर कोनोलीनेही धडाकेबाज फलंदाजी करून 46 चेंडूत 87 धावा कुटल्या. या अर्धशतकी खेळीत 7 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. या धावांचा जोरावर पंजाबने 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 254 धावांचा डोंगर रचला. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊ संघाने 200 धावापर्यंत मजल मारली. परंतु, लखनऊला 255 धावांचं टार्गेट गाठण्यात यश आलं नाही. लखनऊने 20 षटकांमध्ये 5 बाद 200 धावा केल्या. त्यामुळे पंजाबचा या सामन्यात 54 धावांनी विजय झाला. 

लखनऊच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सलामीवर फलंदाज मिचेल मार्श आणि आयुष बदोनीने दमदार सुरुवात केली. मार्शने 28 चेंडूत 40 धावा केल्या. तर बदोनीने 21 चेंडूत 35 धावांची खेळी साकारली. त्यानंतर कर्णधार रिषभ पंतने 24 चेंडूत 43 धावा केल्या. अर्शदीप सिंगने रिषभ पंतला बाद करून लखनऊच्या संघाला मोठा धक्का दिला. त्यानंतर यान्सननेही भेदक मारा करून लखनऊचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनला 9 धावांवर तंबूत पाठवलं. मार्करमने 42 तर मुकूल चौधरीने 21 धावा केल्या.

नक्की वाचा >> Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'त्या' पदांवरील भरतीचा निर्णय रद्द; पुण्यातील उमेदवारांमध्ये संताप

पंजाबसाठी प्रियांश आर्या (93),प्रभसिमरन सिंग (0),कुपर कोनोली(0),कर्णधार श्रेयस अय्यर(5),मार्कस स्टॉयनिस (29),नेहल वढेरा(17) धावांची खेळी केली. तर लखनऊसाठी मोहम्मद शामीने आणि मोहसिन खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.प्रिन्स यादव आणि मनीमरन सिद्धार्थला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. पंजाबसाठी अर्शदीप सिंग,विजयकुमार आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर मार्को जान्सेनला दोन विकेट घेण्यात यश मिळालं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com