जाहिरात

Cricketer Death: मदतीसाठी धावा पण.. भारतीय क्रिकेटपटूचा ट्रेनमध्ये मृत्यू, मित्रांच्या डोळ्यादेखत तडफडून जीव गेला!

अनेक वेळा आपत्कालीन कॉल करूनही त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, दुर्दैवाने वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

Cricketer Death: मदतीसाठी धावा पण.. भारतीय क्रिकेटपटूचा ट्रेनमध्ये मृत्यू, मित्रांच्या डोळ्यादेखत तडफडून जीव गेला!

पंजाब: दिल्लीहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. पंजाबमधील 38वर्षीय दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग यांचे निधन झाले. ते व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार होते. प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. अनेक वेळा आपत्कालीन कॉल करूनही त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, दुर्दैवाने वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंजाबचे दिव्यांग खेळाडू विक्रम सिंग आणि त्यांचे सहकारी बुधवारी रात्री हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये चढले. ते दिल्लीमध्ये व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाले होते.  ट्रेन सुरू झाल्यानंतर काही वेळातच विक्रम सिंग यांना त्रास होऊ लागला ट्रेन मथुराजवळ येताच त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी रेल्वेतील हेल्पलाईन क्रमांकावर अनेक वेळा फोन केले. 

मथुरा स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. मदतीसाठी वारंवार विनंती करूनही काही उपयोग झाला नाही. या घटनेमुळे भारतीय रेल्वेच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विक्रम सिंग आणि त्यांचे साथीदार बुधवारी रात्री हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये चढले. ट्रेन सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या. ट्रेन मथुराजवळ येताच त्यांची प्रकृती बिघडली.

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )

 पहाटे 4.58 वाजता रेल्वे हेल्पलाइनवर आपत्कालीन कॉल करण्यात आला. त्यांच्याकडून त्वरित वैद्यकीय मदत मागण्यात आली. अनेक वेळा फोन करूनही कोणतीही मदत मिळाली नाही. ट्रेन सुमारे 90 मिनिटे उशिराने आली आणि सकाळी 8.10  वाजता मथुरा स्टेशनवर पोहोचली. तोपर्यंत विक्रम सिंग यांचे निधन झाले होते. मथुरा जंक्शनवर, सरकारी रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सिंगचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांनी शवविच्छेदनाची व्यवस्था केली. जीआरपीने औपचारिक कार्यवाही सुरू केली आहे. 

 त्याच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, "तो आमच्या डोळ्यांसमोर वेदनेने विव्हळत होता. आम्ही मदतीसाठी हाका मारत राहिलो, पण कोणीही आले नाही. ही केवळ एक दुःखद घटना नाही, तर ती आमच्या रेल्वेच्या वैद्यकीय आपत्कालीन सेवांचा उडालेला बोजवारा दर्शवते. दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी विलंबाची चौकशी करण्यासाठी अंतर्गत चौकशी देखील सुरू केली आहे. या घटनेमुळे भारतीय रेल्वेच्या आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर चिंता व्यक्त झाली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com