Ravichandran Ashwin on Ricky Ponting Sad Image and PBKS Lose vs RCB: आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) विरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर पंजाब किंग्सच्या (पीबीकेएस) प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सलग सहाव्या पराभवामुळे संघ प्रचंड निराश झाला असताना दिग्गज भारतीय फिरकीपटू आणि पंजाब किंग्सचा माजी कर्णधार रविचंद्रन अश्विनने प्रशिक्षक रिकी पाँटिंग डगआऊटमध्ये एकटे बसलेले पाहून प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या 'ऐश की बात' या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विन म्हणाला की, सामन्यानंतर धर्मशाळेच्या सुंदर पर्वतांसमोर पाँटिंग बेंचवर हताशपणे एकटा बसलेला दृश्य खूप प्रभावी आणि भावनिक होते.
पंजाबच्या पराभवानंतर आर अश्विन संतापला
आर अश्विनने सांगितलं की, स्पर्धेच्या सुरुवातीला संघ पहिल्या दोन स्थानांवर राहण्याच्या मजबूत स्थितीत होता, त्यामुळे यावेळी पाँटिंगच्या मनात अनेक गोष्टी चालू असतील. संघाच्या या दुर्दशेसाठी कोणत्याही खेळाडूला दोष देण्याऐवजी अश्विनने व्यवस्थापनाच्या निर्णयांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉन्टिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना अश्विनने आठवण करून दिली की २०१८ मध्ये पंजाबचा कर्णधार असताना तो स्वतःही अशाच एका वेदनादायक परिस्थितीतून गेला होता.
यावेळी अश्विनने पंजाबच्या सर्वात मोठ्या चुकीवर बोट ठेवले. कोणताही विश्वविजेता संघ हंगामादरम्यान आपले घरचे मैदान वारंवार बदलत नाही. मुल्लानपूरच्या मैदानावर पंजाब सातत्याने सामने जिंकत असताना लीगच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर अचानक धरमशाला येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय अंगलट आला. पंजाबने धरमशाला येथे सलग तीन घरचे सामने गमावले, ज्यामुळे त्यांची सर्व मेहनत वाया गेली. अश्विनच्या मते, घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा गमावणे हेच पंजाबच्या अपयशाचे मुख्य कारण होते.
आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सच्या (पीबीकेएस) सलग सहाव्या पराभवानंतर, अनुभवी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने फ्रँचायझी मालकांवर जोरदार हल्ला चढवला. अश्विनने पंजाब किंग्सच्या दोन वेगवेगळ्या घरच्या मैदानांच्या (मुल्लानपूर आणि धरमशाला) निर्णयावर तीव्र टीका केली. त्याने स्पष्टपणे सांगितले की, पंजाब संघाच्या मालकांनी संघाच्या 'क्रिकेटविषयक गरजांपेक्षा' त्यांच्या 'व्यावसायिक गरजांना' प्राधान्य दिले आणि आता खेळाडूंना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
pic.twitter.com/bcoiLSgzK9
— Shreyass Eraa (@IyerShreyass) May 17, 2026
Coach Saab ko aise dekh kar sach mein dil toot gaya… bahut bura lag raha hai 😭💔
This man hardly ever looked this sad during his entire cricket journey, but today you can see how much Punjab means to him… Ricky Ponting looked truly hurt 😭💔
But no…
व्यवस्थापकांवर फोडले पराभवाचे खापर
अश्विनच्या मते, मुल्लानपूर आणि धरमशाला येथील खेळपट्ट्यांचे स्वरूप, वेग आणि उसळी यामध्ये मोठा फरक आहे. दोन्ही ठिकाणी एकच माती वापरली जात असली तरी, धरमशाला येथील उंचीमुळे चेंडूचा स्विंग बदलतो ज्यामुळे तरुण आणि परदेशी खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य होत नाही आणि पंजाबसाठी हा सामना परदेशातील सामन्यासारखा बनतो. मुल्लानपूरच्या मैदानाचे उदाहरण देताना अश्विन म्हणाला की, पंजाबच्या खेळाडूंनी हंगामाच्या सुरुवातीला तिथे कसून सराव केला होता आणि त्यांना खेळपट्टी इतकी चांगली माहीत होती की, त्यांनी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध २२० धावांचा मोठा डोंगर यशस्वीपणे वाचवला होता.
दरम्यान, पंजाब किंग्सपुढील मार्ग आणखी कठीण झाला आहे, कारण लीग टप्प्यातील त्यांच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या सामन्यात त्यांचा सामना लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (LSG) शी होणार आहे. एकाना स्टेडियमची खेळपट्टी तिच्या संथ स्वभावासाठी आणि फिरकीसाठी ओळखली जाते, ज्यामुळे फलंदाजांसाठी धावा करणे एक मोठे आव्हान बनते. सलग सहा पराभव पत्करलेल्या पंजाब संघासाठी, अशा कठीण खेळपट्टीवर पुनरागमन करणे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली क्षीण आशा जिवंत ठेवणे हे एका लिटमस परीक्षेपेक्षा कमी नसेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world