Ind vs WI : कोणालाच जमलं नाही..जडेजानं करून दाखवलं! दिल्लीच्या मैदानात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा विक्रम

Ravindra Jadeja Test Record : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगत आहे. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने 4 विकेट्स घेत दिग्गज कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ravindra Jadeja New Test Cricket Record
मुंबई:

Ravindra Jadeja Test Record : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगत आहे. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने 4 विकेट्स घेत दिग्गज कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये टेस्टमध्ये जडेजाच्या नावावर एकूण 33 विकेट्सची नोंद झालीय. या मैदानावर टेस्ट क्रिकेटमध्ये कपिल देव यांनी 32 विकेट्स घेतल्या होत्या. पण भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेनं या स्टेडिमयमध्ये 7 सामन्यांमध्ये सर्वाधिक 58 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक विकेट्स घेण्याची नोंद अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. अश्विनने या मैदानावर 5 टेस्टम मॅचन खेळून 33 विकेट्स घेतल्या आहेत. तर जडेजाने या मैदानावर आतापर्यंत एकूण 5 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. कपिल देव यांनी 9 टेस्ट मॅच खेळून 32 विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली होती.

अरुण जेटली स्टेडियममध्ये घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स

  • अनिल कुंबळे - 7 टेस्ट मॅचमध्ये 58 विकेट्स
  • रवींद्र जडेजा - 5 टेस्ट मॅचमध्ये 33 विकेट्स
  • आर अश्वीन - 5 टेस्ट मॅचमध्ये 33 विकेट्स
  • कपिल देव - 9 टेस्ट मॅचमध्ये 32 विकेट्स
  • बीएस चंद्रशेखर - 5 टेस्ट मॅचमध्ये 23 विकेट्स

नक्की वाचा >> KBC च्या हॉटसीटवर घडतंय तरी काय? अमिताभ बच्चन यांच्यासमोरच लिटल विराटनेही केली मोठी चूक, गमावले 1 कोटी रुपये!

भारतीय मैदानात भारसाठी सर्वाधीक इंटरनॅशनल विकेट्स

  • 476 - अनिल कुंबळे (204 इनिंग)
  • 475 - रविचंद्रन अश्विन (193 इनिंग)
  • 377* - रवींद्र जडेजा (199 इनिंग)
  • 376 - हरभजन सिंग (199 इनिंग)
  • 319 - कपिल देव (202 इनिंग)

जॉन कॅम्पबेलला बाद करून जडेजानं रचला इतिहास

जॉन कॅम्पबेलला जडेजाने बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याने जबरदस्त शतकी खेळी केली आणि 115 धावा करून तो बाद झाला. जॉनने 199 चेंडूचा सामना करत 12 चौकार आणि 3 षटकार मारले. या इनिंगमुळे जॉन कॅम्पबेल भारतात टेस्ट शतक बनवणारा पहिला वेस्टइंडिजचा सलामी फलंदाज बनला आहे.कॅम्पबेल आणि शायहोप यांच्यात तिसऱ्या विकेट्ससाठी 177 धावांची भागिदारी झाली.

नक्की वाचा >> Video : पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमबाहेर तुफान राडा! प्रेक्षकांनी केली दगडफेक, PAK vs SA सामन्यात काय घडलं?