
Gaddafi Stadium Lahore Viral Video : पाकिस्तानच्या लाहौर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. हा सामना सुरु असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. अशातच आज गद्दाफी स्डेडियमच्या बाहेर पाकिस्तानच्या लोकांनी मोठा राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या लोकांनी स्टेडियमबाहेर गोंधळ का घातला? याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अद्याप उघड झालेली नाहीय. स्टेडियमबाहेर दोन गटांत मोठा वाद झाल्याने लोकांनी लाठ्याकाठ्यांनी एकमेकांना मारहाण केली. रस्त्यावरच लोकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं कॅमैरात कैद झालं आहे.
रमीझ राझा यांनी बाबर आझमवर साधला होता निशाणा, व्हिडीओ व्हायरल
या सामन्यात पहिल्या दिवशीच्या 48 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडुवर बाबर आझम LBW झाला होता. स्पिनर सेनुरन मुथुसामीने फिरकीची जादू दाखवून बाबरला बाद करण्याचा प्रयत्न केला होता. पण बाबर नॉट आऊट असल्याचा निर्णय अंपायरने घोषित केला. याचदरम्यान रमीझ राजा यांनी बाबरवर निशाणा साधला. जर हा आऊट झाला, तर हा ड्रामा करेल, असं रमीझ राजांनी म्हटलं होतं. रमीझ यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आणि सोशल मीडियावर वाद सुरु झाला.
इथे पाहा गद्दाफी स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं?
Disturbing video coming outside Gaddafi Stadium Lahore.
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) October 13, 2025
Same stadium where South Africa is playing test match. pic.twitter.com/CUlTmZ9mVU
नक्की वाचा >> Palghar CCTV Video : ऑफिसला लवकर पोहोचण्याची घाई नडली! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणीचा पाय घसरला अन् नंतर..
पहिल्या इनिगंमध्ये साईम हार्मरच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी बाबरने 48 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. बाबरने या इनिंगमध्ये चार चौकारही मारले. बाबर क्रिझवर सावध खेळी करत असताना हार्मरच्या चेंडूवर तो (LBW) बाद झाला.दरम्यान, पहिल्या इनिंगमध्ये पाकिस्तानचा सलामी फलंदाज इमाम उल हकने 153 चेंडूत 93 धावांची अप्रतिम खेळी केली. त्याने या इनिंगमध्ये 7 चौकारांसह एक षटकार ठोकला. तर पाकिस्तानचा कर्णधार मसूदने 147 चेंडूत 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यापाठोपाठ बाबर आझम फक्त 23 धावा करून तंबूत परतला. पण विकेटकीपरने रिझवानने मिडल ऑर्डरमध्ये पाकिस्तानचा डाव सावरला आणि 75 धावांची अर्धशतकी खेळी.
Ramiz raja trolling Babar Azam "ye out hoga to drama karega" 😭😂😂 #PAKvSA #BabarAzam pic.twitter.com/Lde4bp0xX3
— Qudart_Ka_Nizaam__𓃵__93000 (@43_49_53_all0ut) October 12, 2025
नक्की वाचा >> Viral : माजी पंतप्रधानांचा किसिंग सीन व्हायरल! यॉटवर सिंगर कॅटी पेरीसोबत झाले रोमॅन्टिक, जगभरात उडाली खळबळ!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world