- रोहित शर्मा इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळण्याची शक्यता
- रोहितने आधी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे
- आता रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची दाट शक्यता आहे
भारत आणि इंग्लंड यांच्यात 19 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर तिसरा वन डे क्रिकेट सामना होत आहे. हा सामना रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. अशी शक्यता क्रिकेट जगतात वर्तवली जात आहे. रोहितने या सामन्यासाठी आपल्या आई वडीलांना लंडन इथं बोलावले आहे. त्यामुळे तर रोहितच्या निवृत्तीच्या चर्चेला अजून बळ मिळाले आहे. रोहितने आधीच टी-20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही तो निवृत्त होणारं असं बोललं जात आहे. त्यानंतर त्याला बीसीसीआयकडून दरमहा पेन्शम मिळणार आहे. ही किती पेन्शन असा, प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तो आकडा पाहीला तर तुम्ही ही हैराण व्हाल.
बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे. ती माजी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी खेळाडूंना पेन्शन देते. 2022 मध्ये या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली होती. बीसीसीआयचे पेन्शन स्लैब खालीलप्रमाणे आहेत.
- 25 किंवा अधिक कसोटी सामने खेळलेले खेळाडू: ₹70,000 प्रति महिना
- 25 पेक्षा कमी कसोटी सामने खेळलेले खेळाडू: ₹60,000 प्रति महिना
- माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू (75 पेक्षा जास्त सामने): ₹52,500 प्रति महिना
- महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: ₹52,500 प्रति महिना
रोहित शर्माला किती मिळणार रक्कम?
रोहित शर्माने आतापर्यंत 67 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे तो ₹70,000 प्रति महिना या सर्वोच्च स्लैबसाठी पात्र ठरतो. यानुसार रोहितला वर्षाला ₹8,40,000 एवढी पेन्शन मिळेल. जी रोजच्या हिशोबाने ₹2,300 होते. दरम्यान, रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या केवळ मीडिया रिपोर्ट्समधील चर्चा आहेत, अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world