Rohit Sharma Retirement News: टीम इंडियाचा माजी कर्णधार, धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्यांनी क्रिडाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे रोहित शर्मा लॉर्ड्सवरील वनडेनंतर निवृत्ती जाहीर करेल, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना रोहित शर्माचा शेवटचा असेल का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. यावर आता बीसीसीआयने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
रोहित मैदान सोडणार.. अखेर BCCIचे स्पष्टीकरण!
रविवारी लॉर्ड्सवर होणारा एकदिवसीय सामना रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, अशी जोरदार चर्चा होती, परंतु बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मला हे स्पष्ट करायचे आहे की, रविवारी लॉर्ड्सवर रोहित आपला शेवटचा सामना खेळेल अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. रोहित भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो संघात राहील, तोपर्यंत तो देशाचे प्रतिनिधित्व करत राहील. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा सामना नसेल."
तसेच भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी रोहित शर्माच्या खराब कामगिरीवरील टीका फेटाळून लावली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील खराब कामगिरीनंतरही रोहित दबावाखाली नाही किंवा खराब फॉर्ममधून जात नाही, असे ते म्हणाले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर रोहितला पाठिंबा देताना कोटक म्हणाले होते, "मला नाही वाटत की रोहितसारख्या क्षमतेच्या खेळाडूवर कोणताही दबाव असेल.
वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळणार का?
दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर या दौऱ्यासाठी संघासोबत कार्डिफमध्ये आहेत. दोन आयसीसी ट्रॉफी जिंकलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माला निवड समिती पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सोबत घेऊ इच्छित नाही, अशा चर्चा होत्या. निवड प्रक्रियेत सहभागी असलेल्या बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार "राष्ट्रीय निवड समिती यशस्वी जैस्वालला अधिक संधी देऊ इच्छिते. त्याने तीन डावांमध्ये दोन शतके झळकावली आहेत." विश्वचषकापूर्वी अंदाजे २० एकदिवसीय सामने शिल्लक आहेत आणि जैस्वालला ते सर्व खेळण्याची संधी दिली पाहिजे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world