जाहिरात

मुंबईचा रियानही चमकला! रोहित शर्माच्या 'या' कारनाम्याची केली बरोबरी, पण CSK च्या विजयानं MI चा खेळ खल्लास?

चेन्नई सुपर किंग्जने आज झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला.त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत पोहोचण्याचं मुंबई इंडियन्सचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे

मुंबईचा रियानही चमकला! रोहित शर्माच्या 'या' कारनाम्याची केली बरोबरी, पण CSK च्या विजयानं MI चा खेळ खल्लास?
MI vs CSK, IPL 2026

Ryan Rickelton Created History: चेन्नई सुपर किंग्ज विरोधात धडाकेबाजी फलंदाजी करून रियान रिकल्टनने मोठा कारनामा केला आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलच्या एका सीजनमध्ये पॉवर प्ले दरम्यान एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याची कामगिरी केली आहे. ही कामगिरी करणारा तो संयुक्तपणे दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने रोहित शर्माच्या त्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हिटमॅन शर्माने सीजनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरोधात झालेल्या एका सामन्यातील पॉवर प्ले मध्ये पाच षटकार ठोकले होते. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जने आज झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला.त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत पोहोचण्याचं मुंबई इंडियन्सचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईला 160 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने 18.1 ओव्हर्समध्ये 2 विके्स गमावून 160 धावा करून या सामन्यात विजय मिळवला.

सनथ जयसूर्याच्या नावावर आहे विशेष रेकॉर्ड

मुंबई इंडियन्ससाी आयपीएलच्या एका सामन्यातील पॉवर प्ले म्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात म्हणजे 2008 मध्ये चेन्नई विरोधात झालेल्या सामन्यात पॉवर प्ले मध्ये सात षटकार मारले होते. तेव्हापासून आतापर्यंत हा विक्रम जयसूर्याच्या नावावरच आहे. 

नक्की वाचा >> Mumbai News: दहिसर-भाईंदरच्या 'त्या' घटनेची मुंबई महापालिकेने घेतली गंभीर दखल, कामगार सुरक्षेबाबत मोठा निर्णय

मुंबईसाठी पॉवर प्ले मध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारे फलंदाज

सात षटकार - सनथ जयसूर्या- विरुद्ध सीएसके - 2008
पाच षटकार - रोहित शर्मा- विरद्ध केकेआर- वानखेडे - 2026
पाच षटकार - रोहित शर्मा - विरुद्ध केकेआर - वानखेडे - 2026
पाच षटकार - रियान रिकल्टन - विरुद्ध सीएसके - चेन्नई- 2026

नक्की वाचा >> Kalyan News: मज्जा, मस्ती अन् रायडिंग! 'त्या' 4 तरुणांनी केला धक्कादायक प्रकार, कल्याणमध्ये होती प्रचंड दहशत

आजच्या सीएसके विरोधात झालेल्या सामन्यात रियान रिकल्टनने 24 चेंडूंचा सामना केला. या सामन्यात त्याने 154.16 च्या स्ट्राईक रेटने 37 धावा केल्या. पाच षटकारांच्या जोरावर रियानने या धावांचा पल्ला गाठला. नूर अहमदने रियानला झेलबाद करुन मुंबई इंडियन्सला धक्का दिला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com