जाहिरात

SA vs NZ: फिन ऐलनचे वर्ल्ड रेकॉर्ड, अवघ्या 33 बॉलमध्ये शतक, 'या' दिग्गज खेळाडूचं मोडलं रेकॉर्ड

धावांचा पाठलाग करताना न्यूझिलंडने पहिल्या पासून सामन्यावर पकड निर्माण केली. दक्षिण अफ्रिकेला एक ही संधी दिली नाही.

SA vs NZ: फिन ऐलनचे वर्ल्ड रेकॉर्ड, अवघ्या 33 बॉलमध्ये शतक, 'या' दिग्गज खेळाडूचं मोडलं रेकॉर्ड
  • न्यूझिलंडने टी-20 विश्वचषकातील उपात्य फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात 9 विकेटने विजय मिळवला
  • फिन ऐलनने अवघ्या 33 चेंडूत जलद शतक करून टी-20 विश्वचषकातील सर्वात जलद शतकाचा नव्या रेकॉर्डची स्थापना केली
  • दक्षिण अफ्रिकेने 20 ओव्हर्समध्ये 169 धावा केल्या होत्या.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दक्षिण अफ्रीका विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात टी-20 विश्वचषकासाठीचा उपात्य फेरीचा सामना कोलकात्यात झाला. या सामन्यात न्यूझिलंडने दक्षिण अफ्रिकेला एक ही संधी दिली नाही. बॉलिंग सोबतच बॅटींगमध्ये ही न्यूझिलंडची टीम सरस ठरली. या सामन्यात न्यूझिलंडने दक्षिण अफ्रिकेवर 9 विकेट आणि 43 चेंडू राखत विजय मिळवला आहे. अहमदाबाद इथं होणाऱ्या फायनलसाठी त्यांनी आपलं स्थान पक्क केलं आहे. पण हा सामना गाजवला तो  फिन ऐलनने. त्याने अवघ्या 33 चेंडूत सेंच्यूरी केली. शिवाय दहा वर्षा पूर्वीचं रेकॉर्ड ही त्याने मोडलं. 

न्यूझिलंडने टॉस जिंकत पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय अगदी बरोबर ठरवा. दक्षिण अफ्रिकेची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांच्या विशिष्ट अंतराने सतत विकेट पडत राहील्या. मार्को यान्सीन याच्या 55 धावांच्या खेळीवर अफ्रीकेने 20 ओव्हर्समध्ये 169 धावा केल्या. न्यूझिलंडला 170 धावांचे लक्ष दिले. ह्या धावा करताना दक्षिण अफ्रिकेचे आठ गडी बाद झाले. धावांचा पाठलाग करताना न्यूझिलंडने पहिल्या पासून सामन्यावर पकड निर्माण केली. दक्षिण अफ्रिकेला एक ही संधी दिली नाही. न्यूझिलंडच्या ओपनर्सने आफ्रिकेच्या गोलंदाजांची पीसं काढली. टिम सिफर्ट,फिन ऐलन यांनी 117 धावांची सलामी दिली. टिमने 33 बॉलमध्ये 58 धावा ठोकल्या. त्यात दोन सिक्स आणि आठ फोरचा समावेश होता. 

नक्की वाचा - T20 World Cup Semifinal: चंद्र ग्रहणाचा फटका टीम इंडियाला! नक्की काय घडलं, वाचा सविस्तर

दुसऱ्या टोकाला फिन ऐलन थांबण्याचं नाव घेत नव्हता. त्याने दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याने अवघ्या 33 चेंडूत 100 धावा कुटल्या. यात त्याने 8 सिक्स आणि 10 फोरची आतशबाजी केली. त्याच्या या खेळूमुळे आफ्रिकेच्या बॉलरला डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही. टी-20 विश्वचषकातील सर्वात जलद शतक नोंदवण्याचं रेकॉर्ड या निमित्ताने ऐलन याने आपल्या नावावर केला. या आधी हे रेकॉर्ड वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर होते. त्याने 2016 च्या T 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्ध अवघ्या 47 चेंडूत शतक झळकावले होते. ते रेकॉर्ड आजच्या सामन्यात ऐलन याने मोडत नवं रेकॉर्ड प्रस्थापित केले. 

नक्की वाचा - Sanju Samson : सेमी फायनलपूर्वी टीम इंडिया अडचणीत! संजू सॅमसनवर येणार बंदी? ICC च्या निर्णयावर देशाचं लक्ष

त्या आधी ख्रिस गेलनेच 50 चेंडूत शतक झळकावले होते. 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये त्यांने हा कारनामा केला होता. त्यावेळी त्यांनी ही खेळी दक्षिण आफ्रीके विरुद्धच केली होती. त्याचं हे रेकॉर्ड आता मोडलं गेलं आहे. दरम्यान या विजयामुळे न्यूझिलंड फायनलमध्ये पोहचलं आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा न्यूझिलंड फायनलमध्ये खेळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा उपात्य फेराचा सामना मुंबईत खेळला जाणार आहे. या सान्यात जिंकणारा संघ न्यूझिलंड विरुद्ध अहमदाबादमध्ये फायनल मॅच खेळणार आहे. 
  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com