जाहिरात

T20 World Cup Semifinal: चंद्र ग्रहणाचा फटका टीम इंडियाला! नक्की काय घडलं, वाचा सविस्तर

टी-20 विश्वचषकाचा सेमी फायनलचा सामना मुंबईत होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात हा सामना रंगणार आहे.

T20 World Cup Semifinal: चंद्र ग्रहणाचा फटका टीम इंडियाला! नक्की काय घडलं, वाचा सविस्तर
  • मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात आयसीसी टी-20 विश्वचषक २०२६ चा उपांत्य सामना होणार आहे
  • चंद्रग्रहणामुळे भारतीय संघाचा सराव वेळ एक तास पुढे ढकलण्यात आला आणि सराव सायंकाळी सात ते नऊ वाजता झाला
  • ग्रहणाच्या काळात मैदानावर उतरणे खेळाडूंना अशुभ वाटल्यामुळे सराव थोडा विलंबित करण्यात आला असल्याचे समजते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

IND vs ENG T20 World Cup Semifinal: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा हाय-व्होल्टेज उपांत्य सामना होणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघाकडे मंगळवारी सरावाची संधी होती. मात्र, 3 मार्च रोजी झालेल्या चंद्रग्रहणामुळे टीम इंडियाच्या सरावाचे वेळापत्रक बदलण्यात आले. भारतीय खेळाडूंनी ग्रहणाच्या काळात सराव करणे टाळल्याने, सत्राची वेळ एक तास पुढे ढकलण्यात आली. वानखेडेवर भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 

मूळ वेळापत्रकानुसार टीम इंडियाचा सराव सायंकाळी 6:00 वाजता सुरू होणार होता. परंतु 6:47 पर्यंत ग्रहणाचा काळ असल्याने या काळात मैदानात उतरणे खेळाडूंना 'अशुभ' वाटले. त्यामुळे हा सराव आता सायंकाळी 7:00 ते 9:00 या वेळेत पार पडला. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळाडू कोणत्याही प्रकारचे जोखीम घेऊ इच्छित नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ग्रहण झाल्यानंतर खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले. 

नक्की वाचा - Sanju Samson : सेमी फायनलपूर्वी टीम इंडिया अडचणीत! संजू सॅमसनवर येणार बंदी? ICC च्या निर्णयावर देशाचं लक्ष

कर्णधार सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या स्पर्धेदरम्यान अनेक मंदिरांना भेटी देऊन विजयासाठी साकडे घातले आहे. ग्रहणाच्या नियमांचे पालन करणे हा देखील याच श्रद्धेचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी ग्रहण झाल्यानंतर मैदानात उतरून सराव केला. भारतात आज अनेक ठिकाणी खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळाले. मुंबईत मात्र धुरकट वातावरण असल्याने चंद्रग्रहण स्पष्ट दिसले नाही. मात्र देशातील इतर ठिकाणी ग्रहण सर्वांना पाहाता आले. 

नक्की वाचा - Rohit Sharma VIDEO: रोहितचा पहिल्या दिवशी 'तो' मोलाचा सल्ला अन् संजूने 23 व्या दिवशी मैदान मारलं! पाहा VIDEO

टी-20 विश्वचषकाचा सेमी फायनलचा सामना मुंबईत होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात हा सामना रंगणार आहे. जिंकणारा संघ फायनलमध्ये जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघानी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दोन्ही संघानी या आधी विश्वचषकावर नाव कोरले आहे. पुन्हा एकदा विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी दोन्ही संघ भिडणार आहे. त्यामुळे उपात्यं फेरीचा सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा केली जात आहे. सामन्या वेळी भारतीय संघा सोबतच इंग्लंडचे चाहतेही मोठ्या संख्येने वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असतील.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com