जाहिरात

Saaniya Chandok Photos: अर्जुन तेंडुलकरच्या होणाऱ्या पत्नीचे 10 फोटो, नणंदबाईंसोबत आहे खास नातं...

सचिन तेंडुलकरचा सुपूत्र अर्जुन तेंडुलकरने एका खासगी कार्यक्रमात सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला आहे.

Saaniya Chandok Photos: अर्जुन तेंडुलकरच्या होणाऱ्या पत्नीचे 10 फोटो, नणंदबाईंसोबत आहे खास नातं...

Arjun Tendulkar's future wife Saaniya Chandok Photos: सचिन तेंडुलकरचा सुपूत्र अर्जुन तेंडुलकरने एका खासगी कार्यक्रमात सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला आहे. सूत्रांनी बुधवारी  NDTV ला याबाबत माहिती दिली. युवा क्रिकेटने खासगी आयुष्यात इतकं मोठं पाऊल उचलल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या कुटुंबाकडून अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सूत्रांनुसार, दोघांचा साखरपुडा कमी जणांच्या उपस्थितीत पार पडला. (Sara Tendulkar's Photo With Arjun Tendulkar's Fiance Sania Chandok)

Latest and Breaking News on NDTV

अर्जुनची होणारी पत्नी सानिया यापूर्वीही अनेकदा त्याच्यासोबत आणि त्याची बहीण सारा तेंडुलकरसोबत दिसली आहे.   (Sara Tendulkar's Photo With Arjun Tendulkar's Fiance Sania Chandok Goes Viral)

Latest and Breaking News on NDTV

सानिया ही मुंबईतील उद्योगपती रवि घई यांची नात आहे. घई कुटुंबीय इंटरकॉन्टिनेंटल हॉटल आणि ब्रुकलिन क्रीमरी आइसक्रीम कंपनीचे मालक आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

सानिया चंडोकचा इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट आहे. तिचे 805 फॉलोअर्स आहेत. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर सामील आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

सानिया चांडोक ही एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे. हिचं कुटुंब अन्न आणि आईस्क्रीमसह विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी ओळखली जाते.

Latest and Breaking News on NDTV

सानिया ही पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून प्रमाणित आहे. तिने त्यांचा एबीसी प्रोग्राम पूर्ण केलाय. ब्रँडच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजनुसार, ती मिस्टर पॉज नावाच्या पाळीव प्राण्यांच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या ब्रँडची संस्थापक देखील आहे.


 

सानिया सार्वजनिकपणे फार सक्रिय नाही. मात्र तिच्या साखरपुड्याची बातमी येताच अर्जुनच्या फॅन्सकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. सानियाचे कुटुंबीय इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत.  

सचिन तेंदुलकर नेटवर्थ- सचिन तेंडुलकर जगातील श्रीमंत क्रिकेटरांपैकी एक आहेत. बातम्यांनुसार, त्यांची संपत्ती 1500 कोटींच्या जवळपास आहे. सचिन जगातील महान क्रिकेटर आहेत. 
 

अर्जुन मुंबई इंडियन्ससाठी खेळला...

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा अर्जुन क्रिकेटमधील त्याच्या अष्टपैलू खेळासाठी ओळखला जातो. 25 वर्षीय अर्जुन स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. अर्जुनने 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अंडर-19 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अर्जुन इंस्टाग्रामवर फारसा सक्रिय नाही, परंतु तो त्याची बहीण सारा तेंडुलकरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेकदा दिसतो. अर्जुन जिमचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करतो.

Latest and Breaking News on NDTV

Latest and Breaking News on NDTV

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?
प्रथमदर्शनी हा लव्ह मॅरेज असल्याचं दिसतं. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. रिपोर्टनुसार, सानिया, सारा तेंडुलकरची चांगली मैत्रिण आहे आणि तिनेच अर्जुन आणि सानियाची भेट घडवून आणली होती. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com