Shafali Verma Record In Women World Cuo 2025 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला विश्वचषकाच्या फायनलच्या सामन्याच्या थरार नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये रंगला. महिलांच्या विश्वकपच्या स्क्वॉडमध्ये समावेश नसणाऱ्या शेफाली वर्माला प्रतिका रावलच्या जागेवर संधी मिळाली. प्रतिका जबरदस्त फॉर्ममध्ये होती. परंतु, प्रतिका दुखापग्रस्त झाल्याने ती सेमीफायनलचा सामना खेळू शकली नाही. तिच्या जागेवर सलामीची फलंदाज म्हणून शेफाली वर्माची निवड करण्यात आली. या सामन्यात शेफालीला धावांचा सूर गवसला नाही. मात्र, शेफालीने आजच्या फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शेफालीने 78 चेंडूत 87 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. या 87 धावांच्या जोरावर शेफालीने इतिहास रचला आहे.
शेफाली वर्माच्या नावावर मोठ्या रेकॉर्डची नोंद
शेफालीचं शतक अवघ्या 13 धावांनी हुकलं. जर शेफालीचं शतक झालं असतं, तर तिने क्रिकेट करिअरच्या 31 व्या वनडेत दुसरं शतक ठोकलं असतं. शतक हुकल्यानंतरही शेफालीच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद करण्यात आलीय. या इनिंगसोबत शेफाली विश्वचषक फायनलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारी दुसरी फलंदाज ठरली आहे. शेफालीने 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं. तिचं वय 21 वर्ष 278 दिवस आहे. म्हणजे शेफालीचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी आता एखाद्या फलंदाजाला वर्ल्डकप फायनलमध्ये कमीत कमी 21 वर्ष 277 दिवस इतक्या वयात अर्धशतक ठोकावं लागेल. हा असा कारनामा आहे, जो वर्ल्डकप फायनलमध्ये आजपर्यंत कोणी केला नाहीय. तसच 48 चेंडूतच अशी कामगिरी करावी लागेल. तेव्हाच शेफालीचा रेकॉर्ड मोडला जाईल.
नक्की वाचा >> Rohit Arya Encounter: '...म्हणून मुंबई पोलिसांनी रोहित आर्यावर गोळी झाडली', वाचा एन्काऊंटरची A To Z स्टोरी
भारताचं दक्षिण आफ्रिकेला 300 धावांचं आव्हान
भारतासाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना सलामीची फलंदाज म्हणून मैदानात उतरली होती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय महिला खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. शेफाली वर्माने 87 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तर स्मृती मंधानाने 58 चेंडूत 45 धावा केल्या. जेमिमा 24 धावा करून झेलबाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही 20 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिप्ती शर्माने 58 धावांची अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाची कमान सांभाळली. तसच रिचा घोषने 34 धावांची महत्त्वाची खेळी केली.
नक्की वाचा >> "कोकणातील नेत्याने संजय राऊतांना केली करणी...", अनिल थत्तेंच्या 'त्या' पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!