Anil Thatte On Sanjay Raut Health Issue : शिवसेना गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत पत्रकार अनिल थत्ते यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. थत्ते यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राऊत यांच्या आरोग्याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. 'संजय राऊत : गंभीर आजाराचा अघोरी अँगल', अशाप्रकारची पोस्ट थत्ते यांनी इंटरनेटवर व्हायरल केली आहे. "संजय राऊतवर कोकणातील जादूटोणा मानण्याऱ्या नेत्याने "करणी" केल्याची चर्चा सोशल मिडीयात आहे. 'करणी' करण्याइतका नेता अंधश्रद्ध असू शकतो पण 'करणी'मुळे कॅन्सर हे कसे मानणार? पण हे खरेच आहे की महाराष्ट्रात 90% सर्व पक्षीय नेते अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असला तरी ब्लॅक मॅजिकवर शंभर टक्के विश्वास ठेवतात. 'करणी' करण्यासाठी.. इतकेच नव्हे तर.. उलटवण्यासाठी लाखो रुपये खर्च करणारे नेते मला ठाऊक आहेत", असं म्हणत थत्ते यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
अनिल थत्ते यांची पोस्ट जशीच्या तशी
संजय राऊत : गंभीर आजाराचा अघोरी अँगल, धक्कादायक गौप्यस्फोट
"ठाण्यातील उलटविलेल्या "करणी"च्या एका प्रकरणात एका नेत्याचा फोटो वापरून अघोरी विधी करताना तीन तांत्रिकांना अटक झाली होती, त्यांनी 'कोणाच्या सांगण्यावरून आपण ही करणी करीत होतो' हे सांगितल्यावर त्याच तांत्रिकाना 'सुपारी' देणाऱ्या राजकीय व्यक्तीवर करणी उलटवण्याच्या अटीवर सोडण्यात आले. योगायोगाने तांत्रिकानी करणी उलटवली असल्याचा दावा केलेला 'तो' नेता काहीच दिवसांत भयानक अतोनात हाल हाल होऊन मृत्यू पावला आणि चर्चेला उधाण आले. आजही जादूटोणा, करणी हा विषय निघाला की ठाण्यातील "ह्या" प्रकरणाची आठवण हमखास काढली जाते. संजय राऊत स्वतः काही नेत्यांवर अंधश्रध्येतून 'कामाख्या' देवीला 56 रेडे बळी दिल्याचा आरोप करीत असे. संजयचा देवावर विश्वास असला तरी 'करणी' होऊ शकते यावर नव्हता.
एकदा मी त्याला ज्योतिरभास्कर जयंत साळगावकर यांनी मला स्वतः सांगितलेली गोष्ट सांगितली तेव्हा तो अवस्थ झाला होता. जयंत साळगावकर यांनी मला सांगितलेली ती धक्कादायक गोष्ट अशी होती. एका पहाटे जयंत साळगावकर यांना अचानक जाग आली आणि त्यांना जाणवले की आपल्यावर मृत्यू साठी करणी केली जाते आहे. जयंत साळगावकर हे स्वतः विलक्षण सामर्थ्यशाली तांत्रिक होते. महान तांत्रिक चंद्रास्वामी ह्यांच्याशी माझा संबंध जयंत साळगावकर यांच्यामुळे कसा केंव्हा आला होता ते मी वेळोवेळी सांगितले आहेच.
नक्की वाचा >> Nalasopara Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काकूर, बाप-लेकाचा जागीच मृत्यू, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
तर त्या पहाटे करणीची जाणीव होताच त्यांनी करणी उलटवण्याची क्रियाविधी सुरु केली. जयंत साळगावकर यांची अघोरी विद्या साधना इतकी अलौकिक होती की आपल्यावर कोण कुठून मृत्यू साठी करणी करतो आहे हे ज्ञात झाले. त्यांनी करणी उलटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि कुटुंबातील एका व्यक्तीला उठवून सांगितले की, " चिपळूण मधील अमुक एका व्यक्तीने आत्ता मला मारण्यासाठी करणी केली पण मी सावध होऊन उलटवली आहे. चिपळूणला फोन करून अमुक एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला आहे का ते कन्फर्म कर.
नक्की वाचा >> Video : "फॉरेनची पाटलीण..", ट्रॅफिकमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने असं काही केलं..सर्वच थक्क झाले!
फोन केला तर खरोखरच "त्या" व्यक्तीचा पहाटे अचानक रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाल्याचे समजले.ही गोष्ट मी जशी ऐकली तशी संजय राऊतला सांगितली.तो अस्वस्थ झाला. म्हणाला "विचित्र आहे. जयंत साळगावकर.. खोटे बोलणार नाहीत पण.." मित्रांनो, अंधश्रद्धा मला देखील अयोग्य वाटते पण मी नावानिशी असे अनेक मती संभ्रमित करणारे प्रसंग काही तर व्ही आय पी साक्षीदारांच्या हवाल्याने सांगू शकतो.
काहीही असो.. आपला संजय लवकर बरा झाला पाहिजे.." महामृत्युंजय मंत्रा"वर माझा विश्वास आहे.ठाण्यातील "धर्माचार्य" म्हणून प्रसिद्ध (माझे "धर्मविधी" मार्गदर्शक) व्ही व्ही आय पी वर्तुळात धार्मिक विधी करणारे वंदनीय श्रीमान वीरकर गुरुजी यांना मी संजय साठी "महामृत्युंजयमंत्रा"चे सत्र करण्यासाठी विनंती केली आहे. मला विश्वास आहे की संजय सुखरूप सुरक्षित राहील. लवकर बरा होईल. संजयला कृपया फोन करू नका पण तुमचे शुभेच्छा संदेश त्याचा आमदार बंधू सुनील राऊत यांना व्हाट्सअप मेसेज करा. फोन कृपया नका करू.
रोज प्रार्थना करा. शक्य तर त्याच्या साठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. अनिल गगनभेदी थत्ते
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world