Shikhar Dhawan: 'या' 2 खेळाडूंमुळे माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर संपले" शिखर धवनचा धक्कादायक खुलासा

त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर लवकर संपुष्टात आले असं शिखरने मान्य केलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याने एक मोठा खुलासा केला आहे. आपलं क्रिकेट करिअर कुणा मुळे संपले याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. त्याचं करिअर संपण्यासाठी दोन खेळाडू कारणीभूत असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्या दोन खेळाडूंमुळे आपली क्रिकेट करिअर संपले असं ही तो म्हणाला आहे. मात्र त्याने त्यासाठी युवा खेळाडूंना दोष दिलेला नाही. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर लवकर संपुष्टात आले असं शिखरने मान्य केलं आहे. त्या दोन खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे भारतीय संघात आपली जागा राहणार नाही याचा अंदाज आपल्याला आला होता असं ही तो म्हणाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धवनने ज्या दोन खेळाडूंचा उल्लेख केला आहे त्यात एक नाव हे शुभमन गिलचं आहे. शुभमन गिल सतत चांगली कामगिरी करत होता. त्याच्या फलंदाजीत सातत्य होतं. तो ज्या पद्धतीने खेळत होता त्यामुळे मला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय एकदिवसीय संघातून बाहेर पडावे लागले होते. 39 वर्षीय धवनने सांगितले की, गिल क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली छाप पाडत होता. एकदिवसीय आणि आयसीसी टूर्नामेंटमधील ही त्याने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती. त्यामुळे त्याच्या स्पर्धेत आपण टीकून राहणे कठीण झाले होते असं ही धवन म्हणाला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - MNS News: 'मराठीचा आदर केला नाही तर फटके पडणारच', मीरारोडचा वाद चिघळणार?

शुभमन गिलमध्ये कमालीचे सातत्य होते.  तो  टी-20 आणि कसोटीतही खूप चांगली कामगिरी करत होता. त्या वेळी टी-20 आणि एकदिवसीय सामने मी खेळत नव्हतो असं शिखर म्हणाला. मी फक्त एकदिवसीय सामन्यांसाठी होतो. पण गिल प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत होता. तो स्वाभाविकपणे स्वतःचे अस्तित्व निर्माण करत होता. त्याच वेळी मला समजले होते की मी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त काळ खेळू शकणार नाही. त्यावेळी आपण मन बनवले होते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ड्रग्ज प्रकरणात सापडल्यास थेट मकोका लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शुभमन गिलनंतर दुसरा खेळाडू जर कुणी असेल तर तो ईशान किशन होता असं ही त्याने सांगितले. किशनने एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकले होते. त्याच वेळी आपल्याला समजले की आता आपल्याल संधी मिळणार नाही. 'द वन' या त्याच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनपूर्वी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत धवनने हा खुलासा केला. "मी खूप अर्धशतके करत होतो, मी शतके केली नाहीत, पण मी बऱ्याच वेळा 70 पेक्षा जास्त धावा केल्या. जेव्हा ईशान किशनने 200 धावा केल्या, तेव्हा माझ्या अंतर्मनाने मला सांगितले, 'ठीक आहे बेटा, हा तुझ्या करिअरचा शेवट  आहे. ' माझ्या आतून एक आवाज आला आणि तेच झाले." असं ही त्याने स्पष्ट केलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - MNS Rada: आधी समजवले, मग कानफटवले! मनसैनिकांनी मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला फटकवले

त्याने पुढे सांगितले, "मग मला आठवते की माझे मित्र मला भावनिक आधार देण्यासाठी आले. त्यांना वाटले की मी खूप निराश होईन. पण मी शांत होतो, मी आनंद घेत होतो." धवनने हे देखील सांगितले केले की, 2021 च्या टी-20 विश्वचषक संघात आपले नाव नसेल याचाही त्याला अंदाज होता. त्याने कधीही कोणाला याबद्दल विचारले नाही, कारण यामुळे काहीही बदलले नसते, असं ही तो शेवटी म्हणाला.