- टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीतून बरा होत आहे.
- काही माध्यमांच्या अहवालानुसार श्रेयस अय्यर मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात आहेत.
- ती एक यशस्वी अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे
Shreyas Iyer: टीम इंडियाचा (Team India) आघाडीचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या दुखापतीमुळे मैदानातून बाहेर आहे. तो रिकव्हरी स्टेजमध्ये आहे. त्यासाठी तो खूप मेहनत ही घेत आहे. उपकर्णधार झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र तो सध्या दुखापतीमुळे नव्हे, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका कथित नात्यामुळे चर्चेत आला आहे. माध्यमांमधील काही अहवालानुसार, श्रेयस अय्यर हा मराठमोळी अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे.
एका 'रेडिट' युजरने केलेल्या दाव्यानुसार, श्रेयस अय्यर एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे त्या अभिनेत्रीचे नाव मृणाल ठाकूर आहे. मृणालचे आणि श्रेयसचे 'सूत जुळले' असून ते दोघे गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत असा या युजर्सचा दावा आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण सध्या प्रायमरी स्टेजला असून दोघांनीही ते खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असं ही त्याचं म्हणणं आहे. हे रिलेशनशिप समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा बॉलिवूड बरोबरच क्रिकेट जगतात ही होताना दिसत आहेत.
मृणाल ठाकूर ही सध्याच्या घडीला बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिने अनेक कमी बजेटच्या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर यश मिळवून दिले आहे. 'सीता रामम' आणि इतर हिंदी चित्रपटांमुळे तिने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. श्रेयस आणि मृणाल यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी या जोडीला तात्काळ स्वीकारले आहे. एवढेच नाही, तर या दोघांचे नाव जोडून चाहत्यांनी #Shreyal हा खास कपल हॅशटॅग तयार केला आहे. हा सध्या ट्रेडिंगमध्ये असल्याचं ही पाहीले जात आहे.
हा हॅश टॅग सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यापूर्वी मृणाल ठाकूरचे नाव अभिनेता धनुषसोबतही जोडले गेले होते. सध्या हे संपूर्ण प्रकरण केवळ सोशल मीडियावरील चर्चांवर आधारित असले तरी, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील या दोन व्यक्तींच्या कथित नात्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून श्रेयस हा क्रिकेट पासून लांब आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण अफ्रीके विरुद्धच्या मालिकेसाठी खेळला नाही. तो आता फीट होत आहे. आगामी मालिकेसाठी तो सज्ज होत आहे.