Smriti Mandhana Wedding Called Off: भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या विषयामुळे चर्चेत होती. आधी लग्न होणार होते म्हणून आणि संगीत सोहळ्यानंतर लग्न पुढे ढकललं म्हणूनही वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळत होत्या. अखेर 7 डिसेंबर रोजी स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्याची पोस्ट शेअर केली. लग्न मोडल्याचे सांगत हा विषय इथेच संपवू इच्छिते, असेही तिने स्पष्टपणे सांगितलं.
पलाश मुच्छल आणि पलक मुच्छलबाबत घेतला मोठा निर्णय
लग्न मोडल्याची पोस्ट शेअर करत स्मृती मानधनाने पलाश मुच्छल आणि पलक मुच्छलबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला. स्मृतीनं दोघांनाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. पलाशनेही स्मृतीला अनफॉलो केलंय.

Photo Credit: Smriti Mandhana And Palash Muchhal Instagram
(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्न मोडलं... विषय संपवायचाय... स्मृती मानधनाने सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट)

Photo Credit: Smriti Mandhana Instagram
लग्न मोडण्याचं कारण अस्पष्टच
दरम्यान लग्न मोडण्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. यादरम्यान स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या सोशल मीडिया पोस्टसह इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्यामागे मोठे कारण असू शकते, असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि देशासाठी खेळणं यावरच लक्ष केंद्रित करायचं असल्याचंही स्मृतीने स्पष्ट केलंय.
Smriti Mandhana Unfollowed Palash Muchhal And Palak Muchhal On Instagram Smriti Mandhana Wedding Called Off Social Media Post
(नक्की वाचा: Smriti Mandhana Palash Muchhal: स्पेशल 'SM 18' टॅटू ते प्रपोजल... स्मृती-पलाशचं लग्न मोडण्यापर्यंत काय-काय घडलं?)
22 नोव्हेंबर रोजी नेमकं काय घडलं?
स्मृती आणि पलाश मुच्छलचा 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. पण संगीत सोहळ्यामध्ये स्मृतीचे वडील श्रीनिवास यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं आढळल्याने श्रीनिवास यांच्यावर औषधोपचार सुरू होते. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानंच लग्न पुढे ढकलल्याची माहिती सांगण्यात येत होती. अखेर 7 डिसेंबर रोजी स्मृतीने लग्न मोडल्याची माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
