जाहिरात

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलची सर्वात पहिली भेट कधी अन् कुठे झाली? दोघांमध्ये किती वर्ष होते प्रेमसंबंध?

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिलीय. पण त्यांच्या पहिल्या भेटीबाबतची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलची सर्वात पहिली भेट कधी अन् कुठे झाली? दोघांमध्ये किती वर्ष होते प्रेमसंबंध?
Smriti Mandhana And Palash Muchhal Latest News
मुंबई:

Smriti Mandhana And Palash Muchhal 1st Meeting :  क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल 23 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार होते.परंतु, स्मृतीचे वडील श्रीनिवास यांची लग्नाच्या दिवशी तब्येत अचानक बिघडल्याने दोघांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर स्मृती मंधानाने लग्नाशी संबंधित फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले. त्यानंतर दोघांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच स्मृती आणि पलाश दोघांनाही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लग्न रद्द झाल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे या दोघांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. परंतु, स्मृती आणि पलाशची पहिली भेट कधी झाली? त्यांच्यात किती वर्ष प्रेमसंबंध होते? असे अनेक प्रश्न इंटरनेटवर उपस्थित केले जात आहेत. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलंय, "मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यातून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी ज्या गोष्टी पवित्र राहिल्या आहेत, त्या गोष्टींबाबात लोक अफवा फसरवून चुकीच्या पद्धतीने रिअॅक्ट होत आहेत.हे पाहणे माझ्यासाठी खूप कठीण होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे आणि मला माझ्यावर विश्वास आहे, मी अशा गोष्टींना ठामपणे सामोरं जाईल.

नक्की वाचा >> Video: मेहुणीने जबरदस्ती भाऊजींच्या तोंडात रसगुल्ला टाकला, नवऱ्यानेही जे केलं, नवरीच्या चेहऱ्याचा रंगच बदलला!

कोणत्याही प्रकारची खात्री न करता अफवांच्या आधारावर कोणालाही जज करणं थांबवा, अशी मी आशा करते. यामागचे सोस्र कधीही माहित होत नाहीत. आपले शब्द अशाप्रकारच्या जखमा देऊ शकतात, ज्यांना आपण कधीही समजू शकत नाही. आपण या गोष्टींबद्दल विचार करत असताना जगात अनेक लोक याचे गंभीर परिणाम भोगत असतात. खोटे आणि बदनामीकारक कंटेंट पसरवणाऱ्यांविरुद्ध माझ्या टीमकडून कठोर कारवाई केली जाईल. माझ्यासोबत उभं राहिलेल्या सर्वांचे आभार", असंही स्मृतीनं म्हटलं आहे.

Latest and Breaking News on NDTV

रिपोर्टनुसार, स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल 2019 पासून ऐकमेकांना डेट करत होते. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यावेळी दोघांच्या कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून स्मृती-पलाशची ओळख झाली होती. या ईव्हेंटमध्ये पलाशने स्मृतीसाठी गाणंही गायल्याचं सांगितलं जात आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चाही खूप दिवसांपासून सुरू होत्या. दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाने 2 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिला विश्वचषक किताब जिंकला होता. या विश्वचषकात मंधानाचेही महत्त्वाचे योगदान होते.

नक्की वाचा >> याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल 

विश्वविजेते झाल्यानंतर तिने लग्नाचा निर्णय घेतला होता. स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या विधी 21 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या होत्या. सोशल मीडियावर हळदी, मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले. यात स्मृती मंधाना धमाल डान्स करताना दिसली. ‘देसी गर्ल'पासून ते ‘तेनू लेके मैं जावंगा' या गाण्यांवर ती नाचताना दिसत आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट संघही आपल्या मैत्रिणीसाठी परफॉर्मन्स देताना दिसला होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com