अलीकडेच आशिया चषक (Asia Cup 2025) संघातून वगळण्यात आल्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सतत चर्चेत आहे. फलंदाजाचा फॉर्म गेला, त्याला वगळं तर चर्चा होणारच. मात्र आता श्रेयस एका नवीन खुलाशामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अय्यरने खुलासा केला आहे की, त्याने अलीकडेच आपला ब्रँड प्रायोजक असलेल्या नाइकीने दिलेली मोठी ऑफर नाकारली आहे. कंपनीने त्याला विम्बल्डनमध्ये टेनिस सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. पण अय्यरने ही ऑफर नाकारली. तेव्हा ऋषभ पंत, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक माजी आणि सध्याचे क्रिकेटपटू टेनिस सामन्यांचा आनंद घेत असताना सर्वांनी पाहिले. पण त्याच वेळी अय्यरने आशिया चषकाच्या तयारीसाठी मैदानात घाम गाळणे पसंत केले. तरी ही अय्यरची संघात निवड झाली नाही.
अय्यरने सांगितले, "नाइकीने मलाही विम्बल्डनची ऑफर दिली होती. पण मी त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. असे वाटत होते की त्यावेळी संपूर्ण भारतच लंडनला गेला होता." नुकताच यूएस टेनिस टूर्नामेंटचे विजेतेपद पटकावलेला अमेरिकेचा अल्कराज आणि श्रेयस अय्यर यांनी नाइकी कंपनीच्या जाहिरातींमध्ये भाग घेतला होता. सध्या ऑस्ट्रेलिया 'ए' विरुद्धच्या सामन्यांच्या तयारीमध्ये व्यस्त असलेल्या भारत 'ए' संघाचा कर्णधार अय्यर म्हणाला, "कोणत्याही खेळाडूसाठी तयारी खूप महत्त्वाची असते, कारण दीर्घकाळात तयारीमुळे अपयशाची शक्यता कमी होते. असा आपला अनुभव आहे असं तो म्हणाला.
ऋतुराजच्या नशिबी पुन्हा उपेक्षा! 184 रन्सची खेळीही व्यर्थ, निवड समितीनं पुन्हा डावललं
पुढे तो म्हणाला की आपल्याला आपल्या तयारीवर विश्वास ठेवावा लागतो. जेव्हा तुम्ही ठरलेल्या पद्धतीने तयारी करता, तेव्हा मैदानात जे काही घडते, ते तुम्ही मैदानाबाहेर केलेल्या गोष्टींसारखेच असते. "अय्यर पुढे म्हणाला, "तुमची तयारी योग्य असेल, तर मैदानात बहुतेक गोष्टी योग्य होतात. अपयश फक्त एक किंवा दोन सामन्यांमध्ये येऊ शकते, त्यापेक्षा जास्त नाही. जर तुमची तयारी चांगली असेल, तर तुम्ही भलेही एक किंवा दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही, तरी तिसऱ्या सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी कराल. माझा अनुभव असाच राहिला आहे असं त्याने स्पष्ट केलं आहे.