Shubman Gill VS Zak crawley: भारत आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये घसामान पाहायला मिळत आहे. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांमध्ये मैदानावर जोरदार संघर्ष झाला, परंतु दिवसाच्या खेळाच्या अखेरीस या संघर्षाचे रूपांतर शब्दयुद्धात झाले, ज्यामध्ये भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली यांच्यात वाद रंगला.
IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा
शनिवार, 12 जुलै रोजी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात हा वाद झाला. टीम इंडियाचा पहिला डाव 387 धावांवर संपला आणि त्यामुळे दोन्ही संघांचा स्कोअर बरोबरीचा राहिला, ज्यामुळे पहिल्या डावात कोणालाही आघाडी मिळू शकली नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा शेवटच्या 6-7 मिनिटांत ते आपली विकेट वाचवू शकतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते.
टीम इंडियाला उर्वरित मिनिटांत 2 षटके टाकायची होती, तर इंग्लंडला दिवसाचा शेवट फक्त एक ओव्हरचा खेळ करायचा होता. अशा परिस्थितीत इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीने जाणीवपूर्क वेळ घालवण्याची रणनीती' अवलंबण्यास सुरुवात केली. म्हणजेच, तो प्रत्येक चेंडूनंतर जाणूनबुजून काहीतरी करत राहिला, ज्यामुळे वेळ वाया जात राहिला. जेव्हा बुमराह ओव्हरमधील तिसरा चेंडू टाकण्यास तयार होता, तेव्हा क्रॉलीला त्यासाठी तयार नव्हता.
त्यानंतर पुढच्याच सेकंदात तो खेळपट्टीवरून बाहेर पडला, ज्यामुळे बुमराह देखील नाराज दिसत होता आणि त्याने पंचांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी स्लिपमध्ये असलेल्या गिलने रागाने इंग्लिश फलंदाजावर संताप व्यक्त केला. तरीही, इंग्लंडचा सलामीवीर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याची विकेट वाचवत होता.
पण खरा गोंधळ पाचव्या चेंडूनंतर झाला. क्रॉलीने बुमराहच्या या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात अपयशी ठरले आणि चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर जोरदार आदळला. अशा परिस्थितीत क्रॉलीला वेदना होत होत्या आणि त्यांनी लगेच ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवले आणि फिजिओला बोलवण्यास सांगितले. येथे गोंधळ सुरू झाला.
IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा
भारतीय खेळाडू वेगाने क्रॉलीच्या दिशेने सरकले. यावेळी कर्णधार गिल स्वतःला रोखू शकला नाही आणि तो थेट क्रॉलीच्या जवळ गेला आणि काहीतरी बोलू लागला. येथून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा सलामीवीर बेन डकेट मध्ये आला आणि गिलशी भांडू लागला. गिलनेही त्याला उत्तर दिले. तथापि, नंतर पंचांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि शेवटच्या चेंडूवर ओव्हर पूर्ण झाला.