जाहिरात

IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा

India vs England, Lords Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी चांगलाच गोंधळ झाला.

IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा
Shubman Gill : टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल अंपायरवर चांगलाच नाराज झाला होता.
मुंबई:

India vs England, Lords Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी  ड्यूक्स बॉलच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.  टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल आणि फास्ट बॉलर मोहम्मद सिराज यांनी या बॉलच्या खराब गुणवत्तेबाबत अंपायरकडे नाराजी व्यक्त केली. गुरुवारी 80 व्या ओव्हरमध्ये दुसरा नवा बॉल घेण्यात आला होता. शुक्रवारी तो फक्त 10 ओव्हर जुना होता. पण, तरीही त्या बॉलच्या स्थितीवर भारतीय टीम समाधानी नव्हता. अखेर 'हुप टेस्ट' (hoop test) मध्ये अपयशी ठरल्याने अंपायरनं बॉल बदलला. 

यानंतरही गिल आणि अंपायर यांच्यात जोरदार चर्चा झाली. भारतीय कॅप्टनला बदललेल्या बॉलचा अकार आवडला नाही. 'हा खरंच 10 ओव्हरपूर्वीचा बॉल आहे का? खरंच? असा प्रश्न सिराजनं विचारलेलं स्टंप माईकवर ऐकू आलं. गिल इतका चिडला होता की त्याने अंपायरशी बोलताना त्यांच्या हातातून अक्षरश: बॉल हिसकावून घेतला. मात्र अंपायरनं गिलचे म्हणणे फेटाळून लावले.

या घटनेवर कॉमेंट्री बॉक्समधून सुनील गावस्कर यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. ते म्हणाले, "इथूनही आपल्याला दिसतंय की हा 10 ओव्हर्सपूर्वीचा बॉल नाही, तर 20 ओव्हर्सपूर्वीच्या बॉलसारखा दिसतोय.  

तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या टेस्ट सीरिजमध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्यूक्स बॉलच्या गुणवत्तेवर टीका केली होती. या बॉलचा आकार बदलत असल्यानं खेळाडूंनी अंपायरकडे बॉल बदलल्याचं चित्र या सीरिजमध्ये नियमितपणे दिसत आहे. 

(नक्की वाचा: Shubhman Gill: एक सामना अन् 5 महारेकॉर्ड मोडण्याची संधी! कर्णधार शुभमन गिल रचणार नवा इतिहास )

बॉल मऊ झाल्यानंतर त्याचा बॉलर्सला कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे बॅटर आणि बॉलरमधील लढत फक्त नवीन बॉलपुरतीच मर्यादीत राहिली आहे. पंतने म्हटले की बॉल एक मोठी समस्या बनला आहे आणि ते खेळासाठी चांगले नाही.

"गेज (बॉल मोजण्याचे साधन) समान असले पाहिजे (ड्यूक्स असो किंवा कूकाबूरा). पण ते लहान असते तर चांगले झाले असते. बॉल खूप त्रास देत आहेत. निश्चितपणे, मला वाटते की ही एक मोठी समस्या आहे," असे पंत म्हणाला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com